Jump to content

कार्निव्हल क्रुझ लाइन

कार्निव्हल क्रुझ लाइन ही अमेरिकेच्या मायामी शहरातील पर्यटन कंपनी आहे. कार्निव्हल कॉर्पोरेशन अँड पीएलसीची उपकंपनी असलेली ही कंपनी जगातील सगळ्यात मोठ्या पर्यटन कंपन्यांपैकी एक आहे.

कार्निव्हलची स्थापना १९७२मध्ये झाली. यात २५ क्रुझ नौका असून त्या मायामी, गॅल्व्हस्टन, पोर्ट कॅनेव्हरल, न्यू ऑर्लिअन्स, फोर्ट लॉडरडेल, लॉंग बीच, सिडनी, शांघाय, सान हुआन सह जगभरातील अनेक बंदरात तळ टाकून असतात.