काराकोरम घाट
काराकोरम घाट | |
---|---|
[[Image:{{{चित्र}}}|{{{चित्र रुंदी}}} px|center}}]] {{{चित्र वर्णन}}} | |
काराकोरम घाट | |
१७.८५३ फूट (५.५४० मीटर) | |
२ | |
लेह | |
हिमालय | |
35°49′23″N 77°48′30″E / 35.82306°N 77.80833°E | |
लेह पासून |
काराकोरम घाट हा चीन आणि भारत यांच्या मधील घाट आहे. काराकोरम पर्वतरांगेतील हा घाट भारतातील लदाख आणि चीनच्या यारकंद प्रांतांना जोडणाऱ्या रस्त्यावर आहे. या रस्त्यावरील सर्वोच्च बिंदू ४,६९३ मी (१५,३९७ फूट)[१] इतक्या उंचीवर आहे.
घाटमाथा हा चीन आणि भारताच्या सीमेवरील दोन डोंगरांमधील ४५ मी रुंदीच्या खिंडीत आहे. याच्या आसपास गवताचे तणही उगवत नाही आणि वेगात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे येथे हिमसुद्धा टिकत नाही. या भागात हिमवादळे मुबलक प्रमाणात होतात व तापमान अगदी कमी असते. याशिवाय अपुरा प्राणवायू, चाऱ्याचा अभाव, इ. कारणे येथून प्रवास करणे दुर्धर करतात. या घाटात पक्का रस्ता नाही व पायवाटेच्या दुतर्फा मरून पडलेल्या जनावर व माणसांची हाडे इतस्ततः पसरलेली आहेत.[२] असे असूनही हिमालय ओलांडण्यासाठीच्या घाटांपैकी हा घाट तुलनेने सोपा समजला जातो. कारण घाटाच्या दोन्ही बाजूंचा चढ तीव्र नाही व उन्हाळ्यात हिमवर्षाव कमी होतो तर इतर ऋतूंमध्ये वाऱ्यामुळे हिम जमिनीवर टिकत नाही.
या घाटातून प्रवास करण्यासाठी आधी ५,३०० मीटर (१७,४०० फूट) उंचीवर असलेल्या देपसांगच्या मैदानातून तीन दिवसांची पायपीट करीत जावे लागते.[३] यानंतर खिंड ओलांडून निर्जन प्रदेशातून हळूहळू उतरत सुगेत दावान (सुगेत घाट) गाठता येतो. हा छोटा घाट उतरल्यावर काराकाश नदीच्या खोऱ्यातील शाहिदुल्ला भागात पोचतो.[४]
सध्या या घाटातून कोणत्याही प्रकारची वाहतूक होत नाही.
काराकोरम या शब्दाचा अर्थ तुर्की भाषेत काळा मुरुम असा होतो.[५]
संदर्भ आणि नोंदी
- ^ SRTM data; the figure is now known to be a few meters lower than provided in Rizvi, Janet. Trans-Himalayan Caravans : Merchant Princes and Peasant Traders in Ladakh, p. 217. 1999. Oxford University Press. New Delhi. ISBN 0-19-564855-2.
- ^ Rizvi, Janet. (1999). Trans-Himalayan Caravans : Merchant Princes and Peasant Traders in Ladakh, pp. 28, 217. Oxford University Press. New Delhi. ISBN 0-19-564855-2.
- ^ Rizvi, Janet. (1999). Trans-Himalayan Caravans : Merchant Princes and Peasant Traders in Ladakh, p. 216. Oxford University Press. New Delhi. ISBN 0-19-564855-2.
- ^ Younghusband, Francis E. The Heart of a Continent: A Narrative of Travels in Manchuria, across the Gobi Desert, through the Himalayas, the Pamirs and Chitral, 1884-94. First published: 1897. London. Unabridged facsimile (2005): Elibron Classics Replica Edition, p. 226. London ISBN 1-4212-6551-6 (pbk); ISBN 1-4212-6550-8 (hbk).
- ^ Younghusband, Francis E. The Heart of a Continent: A Narrative of Travels in Manchuria, across the Gobi Desert, through the Himalayas, the Pamirs and Chitral, 1884-94. First published: 1897. London. Unabridged facsimile (2005): Elibron Classics Replica Edition, p. 225. London ISBN 1-4212-6551-6 (pbk); ISBN 1-4212-6550-8 (hbk).