कारा समुद्र
कारा समुद्र (रशियन: Ка́рское мо́ре) हे आर्क्टिक महासागराचे एक अंग आहे. हा समुद्र सायबेरियाच्या उत्तरेस व नोवाया झेम्ल्याच्या पूर्वेस स्थित असून तो बारेंट्स समुद्रापासून कारा सामुद्रधुनीने अलग झाला आहे. पूर्वेस सेवेर्नाया झेम्ल्या हा द्वीपसमूह कारा समुद्राला लापतेव समुद्रापासून वेगळा करतो. कारा समुद्राच्या उत्तरेस फ्रान्झ जोसेफ द्वीपसमूह आहे.