कायथा संस्कृती
कायथा संस्कृती इसवी सनाच्या पूर्वी २६०० ते १८०० शे या काळात अस्तित्वात होती. कायथा हे गाव मध्यप्रदेशमधील उज्जैन पासून पूर्वेकडे २५ किमी अंतरावर छोटी काली सिंध या नदीच्या तीरावर आहे.ही नदी चंबळ नदीची उपनदी आहे.
वैशिष्ट्ये
"कायथा संस्कृती" नागरी हडप्पा संस्कृतीशी समकालीन होती. कायथा संस्कृतीच्या लोकांचे जीवन शेती आणि पशुपालनव्यवसाय वर अवलंबून होते.ते प्रामुख्याने हाताने घडवलेली मातीची भांडी ,गारगोटीच्या दगडांपासून बनविलेली सुक्षमस्त्रे वापरत होते.त्याखेरीज कायथा येथील घरांमध्ये तांब्याच्या कुऱ्हाडी आणि बांगड्या,मौल्यवान खड्यांचे मणी असलेले हार,संगजिरा या दगडाच्या भुकटीपासून बनवलेले चकतीच्या आकाराचे छोटे मणी यांसारख्या वस्तू मिळाल्या कायथा संस्कृती आणि हडप्पा संस्कृती यांच्यातील परस्परसंबंध हडप्पा नगरांच्या उदयाचाही आधीच्या काळापासून असावा,असे दिसते.
संबंध
कायथा संस्कृतीच्या नंतर राजस्थानातील आहाड संस्कृतीचे लोक मध्यप्रदेशात आले.काही काळ या दोन्ही संस्कृती मध्यप्रदेशात एकत्रित नांदल्या असण्याचीही शक्यता आहे.त्यानंतरच्या काळात माळवा संस्कृतीचे अवशेष मिळतात.