कामेच्छा
समागमोत्सुकता
समागमोत्सुकता ही प्रत्येकीच्या बाबतीत वेगळी असते. त्यामध्ये आजारपण, नवीन बालकाचा जन्म,
अतिशय श्रम अथवा एखादा वाईट दिवस यामुळे बदल दिसून येतो. बहुतेक स्त्रियांमध्ये मासिकपाळी आणि त्यांनुसार हार्मोन्समध्ये होणारे बदल यामुळे संभोगमोत्सुकतेमध्ये जास्त बदल झालेला आढळून येत नाही. ह्या स्त्रिया संतती नियमनासाठी हार्मोन्सचा वापर करीत नाहीत अशा स्त्रिया बीजांड परिपक्व होऊन बीजपुंज अलग होण्याच्या काळात समागामासाठी जास्त उत्सुक असतात तर काही स्त्रिया मासिकपाळीच्या काळामध्ये समागमाची अभिलाषा धरतात.
समागमोत्सुकता आणि समागमाचे अभिलाषा यामध्ये हार्मोन्समध्ये होणारे बदल आणि व्यग्रतेमुळे येणारा शीण अशा अनेक कारणांमुळे बदल झालेला दिसून येतो. तुमच्या जोडीदाराची इच्छा जर कमी जास्त असेल तर त्यामुळे देखील तुमच्या वर परिणाम दिसून येतो. समोगमोत्सुकता ही रजोनिवृत्तीच्या काळात वाढलेली दिसून येते. कारण त्यावेळी गरोदर राहण्याची भीती नसते. मुले देखील घरात नसतात आणि त्यामुळे समागमाबद्दल जास्त उत्साह असतो. काही स्त्रियांच्या बाबतीत रजोनिवृत्तीनंतर समागमोत्सुकता कमी झालेली आढळून येते.[१]
संदर्भ
- ^ "संग्रहित प्रत". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-03-06 रोजी पाहिले.