Jump to content

कामिकावा मारू

कामिकावा मारू (神川丸) हे शाही जपानी आरमाराचे समुद्री विमानांची देखभाल करणारे जहाज होते. या विमानाची बांधणी कोबे येथे झाली व डिसेंबर १३, इ.स. १९३६ रोजी याचे व्यापारी नौकेच्या रूपात जलावतरण झाले. सप्टेंबर १८, इ.स. १९३७ रोजी शाही आरमाराने याचा कब्जा घेतला व १९३९मध्ये याचे रूपांतर विमानांची देखभाल करणाऱ्या जहाजात करण्यात आली.

या जहाजाने दुसऱ्या चीन-जपान युद्धात तसेच दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला. मे २९, इ.स. १९४३ रोजी कॉरल समुद्राच्या लढाईत यु.एस.एस. स्कॅम्प या पाणबुडीने टोरपेडोद्वारा याचा वेध घेतला व हे जहाज कावियेंगच्या वायव्येस अंदाजे ४०० किमी अंतरावर बुडाले.