कामायनी एक्सप्रेस
११०७१/११०७२ कामायनी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी रेल्वेसेवा आहे. मध्य रेल्वेद्वारे चालवली जाणारी ही गाडी मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते उत्तर प्रदेशच्या बलिया रेल्वे स्थानकांदरम्यान रोज धावते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश राज्यांतून धावणारी कामायनी एक्सप्रेस मुंबई व बलिया दरम्यानचे १,६९७ किमी अंतर ३४ तास व २५ मिनिटांत पूर्ण करते.
प्रसिद्ध हिंदी कवी जयशंकर प्रसाद ह्यांनी लिहिलेल्या कामायनी नावाच्या लोकप्रिय कवितेवरून ह्या रेल्वेचे नाव देण्यात आले आहे.
प्रमुख थांबे
- लोकमान्य टिळक टर्मिनस
- ठाणे रेल्वे स्थानक
- कल्याण रेल्वे स्थानक
- इगतपुरी रेल्वे स्थानक
- नाशिक रोड रेल्वे स्थानक
- मनमाड रेल्वे स्थानक
- जळगाव रेल्वे स्थानक
- भुसावळ रेल्वे स्थानक
- खंडवा रेल्वे स्थानक
- इटारसी रेल्वे स्थानक
- भोपाळ रेल्वे स्थानक
- कटनी रेल्वे स्थानक
- अलाहाबाद रेल्वे स्थानक
- वाराणसी रेल्वे स्थानक
- बलिया रेल्वे स्थानक