Jump to content

कामाख्या प्रसाद सिंह देव

ब्रिगेडियर कामाख्या प्रसाद सिंग देव (जन्म: ६ ऑगस्ट, १९४१) हे ओरिसा राज्यातील भूतपूर्व धेनकनाल संस्थानचे संस्थानिक आणि भारतीय लष्करातील निवृत्त ब्रिगेडिअर आहेत. ते १९६७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये स्वतंत्र पक्षाचे उमेदवार म्हणून तर १९८०, १९८४, १९९१, १९९६ आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून ओरिसा राज्यातील धेनकनाल लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते १८ जानेवारी, १९९३ ते १५ सप्टेंबर ,१९९५ या काळात पी.व्ही.नरसिंह राव यांच्या मंत्रीमंडळात माहिती आणि प्रसारणमंत्री होते.