कामचत्का द्वीपकल्प
कामचत्का द्वीपकल्प (रशियन: полуо́стров Камча́тка) हा रशियाच्या अति पूर्व भागामधील एक द्वीपकल्प आहे. १,२५० किमी लांबी असलेल्या ह्या द्वीपकल्पाच्या पूर्वेस प्रशांत महासागर तर पश्चिमेस ओखोत्स्कचा समुद्र आहेत. राजकीय दृष्टया हा भूभाग रशियामधील कामचत्का क्रायच्या अखत्यारीत आहे. पेत्रोपावलोव्स्क-कामचत्स्की हे ह्या द्वीपकल्पावरील प्रमुख शहर आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- विकिव्हॉयेज वरील कामचत्का पर्यटन गाईड (इंग्रजी)
- युनेस्को जागतिक वारसा स्थान
- पर्यटन