Jump to content

काप

काप हा कानात घातला जाणारा एक अलंकार आहे.

हा दागिना महिला वापरतात. खूप पूर्वीपासुन काप कानात घातले जातात. हा दागिना प्रामुख्याने खेडेगावात जास्त प्रमाणात पहायला मिळतो. काप खूप प्रकारचे असतात. ते सोन्याचे किंवा चांदीचे असतात. जातीप्रमाणे त्याची नक्षी बदलते. मृत्यूनंतर सुद्धा हा दागिना काढून घेण्याची पद्धत नाही. फक्त हाच एक दागिना बाईसोबत शेवटपर्यंत जातो असे म्हणतात.

काप गेले आणि भोके राहिली ही 'वैभव गेले पण त्याच्या खुणा राहिल्या' अशा अर्थाची म्हण या अलंकारावरून आली आहे.

चित्र दालन

संदर्भ

साचा:संदर्भयदी