कानो
कानो Kano | |
नायजेरियामधील शहर | |
कानो | |
देश | नायजेरिया |
राज्य | कानो राज्य |
क्षेत्रफळ | ४९९ चौ. किमी (१९३ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | २१,६३,२२५ |
प्रमाणवेळ | यूटीसी+०१:०० |
कानो ही नायजेरिया देशाच्या कानो राज्याची राजधानी व लागोस खालोखाल नायजेरियामधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे. कानो नायजेरियाच्या उत्तर भागात स्थित असून ते उत्तर नायजेरियाचे आर्थिक केंद्र आहे. येथे हौसा जमातीचे लोक मोठ्या संख्येने स्थायिक आहेत व हौसा भाषा येथे मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. कानोमधील रहिवासी प्रामुख्याने मुस्लिम धर्मीय असून येथे २००० सालापासून शारिया कायदा लागू आहे.
बोको हराम ह्या अतिरेकी संघटनेने कानोमध्ये अनेक बॉंबहल्ले घडवून आणले आहेत ज्यांमध्ये शेकडो नागरिक बळी पडले.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- विकिव्हॉयेज वरील कानो पर्यटन गाईड (इंग्रजी)