Jump to content

कान (फ्रान्स)

हा लेख फ्रान्समधील कान शहराबद्दल आहे. कान शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पहा - कान (निःसंदिग्धीकरण).

कान
Cannes
फ्रान्समधील शहर


कान is located in फ्रान्स
कान
कान
कानचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 43°33′5″N 7°00′46″E / 43.55139°N 7.01278°E / 43.55139; 7.01278

देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
राज्य प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर
क्षेत्रफळ १९.६२ चौ. किमी (७.५८ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ७१,६९०


कान हे फ्रान्सच्या आग्नेय भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर व इटलीच्या सीमेजवळ वसलेले एक शहर आहे.

इतिहास

या शहराला प्राचीन इतिहास आहे. मात्र याची भरभराट इ.स. १८३०च्या पुढेच झाली. काही ब्रिटिश अधिकारी इटलीला जातांना येथे राहण्यास होते त्यांना हे शहर आवडले. तसेच अनेक धनवान व अधिकारी फ्रेंच लोकांनी येथे आपले सुटीचे घर बांधले. पुढे येथे कान चित्रपट उत्सव सूरू झाला. त्यानंतर हे शहर आंतरराष्ट्रीय नकाशावर आले. या उत्सवामुळे अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथील हॉलिवूडचे अनेक मान्यवर कलाकार दर वर्षी येथे येऊन जातात.

हवामान

डिसेंबर ते फेब्रुवारी हे महिने वगळता तापमान सुखद असते. उन्हाळा आला असता येथे जवळपास बारा तास सुर्यप्रकाश मिळतो त्यामुळे हे युरोप मधले महत्त्वाचे पर्यटन केंद्र बनले आहे.