Jump to content

कातगोळ्या

विड्याचे घटकपदार्थ: गुंडाळलेली नागवेलीची पाने, डाव्या बाजूला वरच्या भागात पक्क्या सुपारीच्या कातळ्या, उजव्या बाजूला वरच्या भागात कच्च्या सुमारीच्या कातळ्या, उजव्या बाजूला मध्यभागी तंबाखू व उजव्या बाजूकडील खालच्या कोपऱ्यात लवंगा.

या काताच्या गोळ्या असतात. विड्यात सुगंधाकरता त्या घातल्या जातात.

प्रथम कात कुटून त्याची वस्त्रगाळ पूड करतात. त्यानंतर केवड्याची ताजी पाने घेऊन त्या पानांमध्ये ती पूड भरतात व ती पूड भरलेली केवड्याची पाने ६ ते ८ दिवस गुंडाळून, बांधून ठेवतात.

त्यानंतर ती बांधलेली पाने सोडवून केवड्याचा रस शोषलेली ती काताची किंचित ओलसर असलेली पूड निपटून वेगळी काढतात व अतिशय उच्च दर्जाचे केवड्याचे अत्तर अगदी किंचित हाताला घेऊन त्या पुडीच्या लहान आकाराच्या (खोगोच्या गोळ्यांएवढ्या) गोळ्या वळतात. पुढे साधारण महिनाभर या कातगोळ्या अगदी सहज टिकतात.त्यानंतर मात्र त्याला बुरशी येण्याची शक्यता असते.

या कातगोळ्या विड्यात घालून खाल्ल्यास विड्याला विशेष सुगंध येतो.

नारायणराव बालगंधर्व त्यांच्या विड्यात या कातगोळ्यांचा वापर करायचे.

हेही पाहा