काडीवली देवकन्हई
काडीवली देवकन्हई (इंग्लिश:Indian Wiretailed Swallow) हा एक पक्षी आहे.
ओळख
शेपटीच्या टोकाची पिसे पाच इंचापेक्षा अधिक लांब दिसायला सामन्य देवकन्हईसारखी ; परंतु खालीलसर्व भागांचा रंग पांढरा. डोके तांबूस, शेपटी किंचित दुभंगलेली. शेपटीच्या टोकाची पिसे तारेसारखी. काळसर पंखांवरील पांढऱ्या रेषा उठून दिसतात.
वितरण
निवासी अंशतःस्थलांतर करणारे. भारतात जवळजवळ सर्वच. पाकिस्तान आणि उत्तर भारत, तसेच ,नेपाळ सिक्कीम व भूतानमध्ये उन्हाळी पाहुणे. मार्च ते सप्टेंबर या काळात वीण.
निवासस्थाने
पाण्याजवळ असलेली माळराने आणि शेतजमिनीचा प्रदेश.
संदर्भ
- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली