Jump to content

काजोल

काजोल
जन्मकाजोल मुखर्जी
५ ऑगस्ट, १९७४ (1974-08-05) (वय: ५०)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ १९९२ - २००१, २००६ - २०१०
भाषाहिंदी भाषा
पुरस्कार पद्मश्री(२०११)
वडील शोमू मुखर्जी
आई तनुजा
पती
अजय देवगण (ल. १९९९)
अपत्ये न्यासा, युग
नातेवाईक तनिशा, राणी मुखर्जी

काजोल देवगण (पूर्वीचे नाव: काजोल मुखर्जी, ५ ऑगस्ट १९७४) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री व बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक आहे. आपल्या अभिनयासाठी काजोलने आजवर ६ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत (नूतनसोबत बरोबरी) ज्यांपैकी विक्रमी ५ पुरस्कार सर्वोत्तम अभिनेत्री ह्या श्रेणीमध्ये आहेत. २०११ साली भारत सरकारने काजोलला पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले.

१९९२ सालच्या बेखुदी ह्या चित्रपटामधून काजोलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९९३ साली शाहरूख खानसोबतचा बाजीगर हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. त्यानंतर १९९५ साली आदित्य चोप्राने आपल्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ह्या चित्रपटामध्ये काजोलला आघाडीची भूमिका दिली. ह्या चित्रपटाच्या तुफान यशामुळे काजोल यशाच्या व कीर्तीच्या शिखरावर पोचली. ह्यानंतरच्या काळात करण जोहरने काजोल व शाहरूख खान जोडीसोबत अनेक यशस्वी चित्रपट काढले.

चित्रपट यादी

वर्ष चित्रपट
१९९२बेखुदी
१९९३बाजीगर
१९९४उधार की जिंदगी
१९९४ये दिल्लगी
१९९५करण अर्जुन
१९९५ताकत
१९९५हलचल
१९९५गुंडाराज
१९९५दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे
१९९६बम्बई का बाबू
१९९७गुप्त: द हिडन ट्रुथ
१९९७हमेशा
१९९७मिन्सारा कनावू (तमिळ)
१९९७इश्क
१९९८प्यार किया तो डरना क्या
१९९८डुप्लिकेट
१९९८दुश्मन
१९९८प्यार तो होना ही था
१९९८कुछ कुछ होता है
१९९८दिल क्या करें
१९९९हम आपके दिल में रहते हैं
१९९९होते होते प्यार हो गया
२०००राजू चाचा
२००१कुछ खट्टी कुछ मीठी
२००१कभी खुशी कभी गम
२००३कल होना हो
२००६फना
२००६कभी अलविदाना कहना
२००७ॐ शांति ॐ
२००८यू मी और हम
२००८हाल-ए-दिल
२००८रब ने बना दी जोडी"
२००९विघ्नहर्ता श्री सिद्धीविनायक
२०१०माय नेम इज खान
२०१०वी आर फॅमिली
२०१०तूनपूर का सुपर हीरो
२०१२मक्खी
२०१२स्टुडन्ट ऑफ द इयर

पुरस्कार

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील काजोल चे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत