काजल अग्रवाल
काजोल याच्याशी गल्लत करू नका.
काजल अगरवाल | |
---|---|
काजल अगरवाल, २०१८ | |
जन्म | १९ जून, १९८५ मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय (चित्रपट) |
कारकीर्दीचा काळ | इ.स. २०१७ - चालू |
भाषा | हिंदी |
प्रमुख चित्रपट | मगधीरा, सिंघम |
वडील | विनय अग्रवाल |
आई | सुमन अग्रवाल |
पती | गौतम किचलू (ल. २०२०) |
काजल अगरवाल ( १९ जून १९८५) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. प्रामुख्याने दक्षिण भारतीय चित्रपटंमध्ये झळकणाऱ्या काजलने २००४ साली क्यूं! हो गया ना... ह्या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. त्यानंतर २००७ सालापासून तिने तेलुगु सिनेसृष्टीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले ज्यांपैकी काही प्रचंड यशस्वी झाले. २००९ सालच्या मगधीरा ह्या सिनेमामधील भूमिकेसाठी काजलला सर्वोत्तम अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
२०११ सालच्या यशस्वी सिंघम सिनेमामध्ये काम करून काजलने हिंदी चित्रसृष्टीत पुनरागमन केले. २०१२ सालचा तिने भूमिका केलेला स्पेशल २६ हा सिनेमा देखील गाजला.
बाह्य दुवे
इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील काजल अग्रवाल चे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत