कागाई
कागाई (इंग्लिश:lesser blackbacked gull) हा एक पक्षी आहे.
मध्यम आकाराच्या बद्काएवढी. डोके, मान, खालचा भाग आणि शेपूट शुभ्र. वरील रंग राखी. जवळजवळ काळपट.पाय पिवळे, नर-मादी दिसायला सारखेच असतात.
वितरण
पाकिस्तान आणि पश्चिम भारतीय द्वीपकल्प या भागांत हिवाळी पाहुणे.समुद्रापासून दूर चित्राल,दिल्ली,कचार,मणिपूर, मध्यप्रदेश आणि ओरिसात हिवाळ्यात आढळून येतात.
निवासस्थाने
समुद्रकिनारे आणि नद्या अश्या ठिकाणी वास्तवास असतात.
संदर्भ
- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली