कागल विधानसभा मतदारसंघ
कागल विधानसभा मतदारसंघ - २७३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, कागल मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील १. कागल तालुका, २. आजरा तालुक्यातील उत्तुर महसूल मंडळ आणि ३. गडहिंग्लज तालुक्यातील गडहिंग्लज महसूल मंडळ आणि गडहिंग्लज नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. कागल हा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हसन मियालाल मुश्रीफ हे कागल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | हसन मियालाल मुश्रीफ | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२०१४ | मुश्रीफ हसन मियालाल | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२००९ | मुश्रीफ हसन मियालाल | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
कागल | ||
उमेदवार | पक्ष | मत |
मुशरीफ हसन | राष्ट्रवादी | १,०४,२४१ |
संजयसिंह सदाशिवराव मंडलिक (दादा) | अपक्ष | ५७,८२९ |
संजय आनंदराव घाटगे | स्वाप | ५७,२७१ |
राजेंद्र गोविंदा शिंदे | अपक्ष | २,२३२ |
सिद्धार्थ आबासो नागरत्न | बसपा | १,९७७ |
प्रभाकर गणपती हेगडे | अपक्ष | १,१५८ |
महेश मारुती आवटे | अपक्ष | ८२३ |
एस.आर. तात्या पाटील | अपक्ष | ५२१ |
भाई पी.टी. चौगुले | अपक्ष | २९५ |
संदर्भ
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर कागल विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २० जुलै २०१३ रोजी पाहिले.