Jump to content

कागल तालुका

कागल तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. कागल तालुक्यातून दूधगंगा, वेदगंगा, चिणशपकोत्रा या तीन नद्या वाहतात. कागल, बिद्री व हमीदवाडा या तीन गावांमध्ये साखर कारखाने आहेत. याखेरीज तालुक्यात सहकारी दूधसंघही आहेत. कागलण तालुका राजकारणाचे विद्यापीठ म्हणून ओळखला जातो करण येथे गामविकास मत्री मुश्रीफ, खासदार प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार संजय बाबा घाटगे, विक्रमसिंह घाटगे यांसारखी नेते मंडळी आहेत या तालु्क्यात ८५ गावे आहेत. विजय पाटील या तालुक्याचे सध्याचे (फेब्रुवारी २०१६) तहसीलदार आहेत. हा तालुका करवीर प्रांत अधिकारी यांचे अंतर्गत येतो .या तालुक्यात कागल व मुरगुड या दोन नगरपरिषदा आहेत. या तालुक्यातील व्हन्नूर हे ३५०० लोकसंख्या असलेले एक गाव आहे. ते कागलपासून पाच किलोमीटरवर आहे.

कागल पासून १७ किमी अंतरावर असलेले कागलच्या राजकारणाचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे म्हाकवे हे गाव प्रसिद्ध आहे. म्हाकवे गाव प्रगतिशील असून येथे नेहमीच राजकीय व शैक्षणिक संघर्ष पहायला मिळत असतो. म्हाकवे गावामधील सत्संग परिवार गावकऱ्यांना तसेच गाव परिसरातील लोकांसाठी पाच दिवस चालणारी एक व्याख्यानमाला आयोजित करत असतात. ही व्याख्यानमाला 'सत्संग व्याख्यानमाला' म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. ही व्याख्यानमाला दरवर्षी जानेवारी महिन्यात असते.

गाव

या तालुक्यातील काही गावे पुढीलप्रमाणे : चौंडाळ सोनगे,कौलगे, चिखली,रणदेवीवाडी, वंदूर, करडयाळ, कागल, कापशी, तमनाकवाडा, बामणी, बिद्री, भडगांव, माधाळ, मुरगुड, म्हाकवे, व्हनाळी, व्हन्‍नूर, शेंडूर, हमीदवाडा,कुरुकली,वाळवे खुर्द, साके

कोल्हापूर जिल्ह्यातील तालुके
आजरा तालुका | करवीर तालुका | कागल तालुका | गगनबावडा तालुका | गडहिंग्लज तालुका | चंदगड तालुका | पन्हाळा तालुका | भुदरगड तालुका | राधानगरी तालुका | शाहूवाडी तालुका | शिरोळ तालुका | हातकणंगले तालुका