Jump to content

कांदा

कांदा

कांदा संपूर्ण जगभरात खाल्ली जाणारी एक भाजी आहे. वनस्पतीचे शास्त्रीय नाव ऍलियम सेपा आहे.

कांदा पीक

कांदा हे भारतातील एका महत्त्वाचे पीक आहे.

लागवड

कांद्याची लागवड कमीतकमी ७,००० वर्षांपासून निवडक पद्धतीने केली जाते. कांदा ही द्वैवार्षिक वनस्पती आहे, परंतु सामान्यत: वार्षिक म्हणून घेतले जाते. कांद्याच्या आधुनिक जाती साधारणतः 15 ते 45 सेमी (6 ते 18 इंच) उंचीपर्यंत वाढतात. कांद्याची पाने पिवळसर- हिरव्या निळ्या रंगाची असतात आणि ती चपट्या, पंखाच्या आकाराच्या गुंडाळणीमध्ये एकट्याने वाढतात. ते चपटे, पोकळ आणि दंडगोलाकार असतात. कांदा परिपक्व होताना, त्याच्या पानांचा तळ आणि त्याच्या कंदामध्ये अन्न साठा जमा होण्यास सुरुवात होते. कांदा भारतातून अनेक देशात निर्यात होतो,उदा. नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, इत्यादि. कांदयाचे पीक भारतात प्रामुख्याने महाराष्ट्र् व कर्नाटक राज्यात व गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा या राज्यांमध्ये घेतले जाते.

अशा जागी कांदा प्रक्रिया करून कांद्याची भुकटी बनवली जाते. भारतात महाराष्ट्रात कांद्याची शेती सर्वात जास्त होते. येथे वर्षातून दोन वेळा कांद्याचे पीक घेतले जाते- एक नोव्हंबर आणि दूसरे मे महीन्याच्या जवळ पास. जगात कांद्याची शेती १७८९ हजार हेक्टर क्षेत्रफळावर घेतली जाते. ज्यात २५३८७ हजार मी. टन उत्पादन होते. भारतात ऐकून २८७ हजार हेक्टर क्षेत्रफळावर पीक घेतल्या वर २४५० हजार टन उत्पादन प्राप्त होते. कांदा शीतऋतुतील पीक आहे परंतु जास्त शीत वातावरण हानिकारक असते आणि तापक्रम जास्त असल्यास ही हानिकारक असते. कांद्याचे विपुल उत्पादन मिळवण्यासाठी पुरेशा सूर्य प्रकाशाची आवश्यकता असते. कांद्याचे कन्द दीर्घ प्रकाश अवधि (Long Day Length) मध्ये चांगले बनतात. कन्दीय पीक असल्याकारणाने भुसभुशीत आणि जल निचरा होणारी जमीन उत्तम मानली जाते. चिकणमाती,गाळ मातीची जमीन सर्वोत्तम असते या साठी भारी जमीन योग्य नसते. जमिनीचा पीएच 5.8-6.5च्या मध्ये असणे आवश्यक आहे. कांद्यासाठी एकूण 12-15 पाण्याची आवश्यकता असते. 7-12 दिवसाच्या अन्तराने जमिनीनुसार पाणी देणे गरजेचे आहे. रोपांच्या शिरा जेव्हा कोमेजणे हे कंद तयार होण्याचे लक्षण आहे, त्यामुळे तेव्हा पाणी देणे थांबवावे.[ संदर्भ हवा ]गोव्यामध्ये श्रावण महिन्यात काही लोक कांदा खात नाही.

सूक्ष्म अन्नद्रव्याअभावी होणारे परिणाम

  • 'तांबे' या सूक्ष्म द्रव्याअभावी कांदे कडक न राहता मऊ पडतात.त्यावरील पापुद्रा ठिसूळ व फिकट पिवळा पडून गळतो.
  • 'बोरॉन' या सूक्ष्म द्रव्या अभावी रोपाची वाढ खुंटते. पातीचा रंग करडा व क्वचित निळसर होतो.
  • 'झिंक' या सूक्ष्म द्रव्या अभावी पाने जाड होतात. ती खालचे बाजूस वाकतात. पानावर रंगीत चट्टे दिसतात.

खते

जैविक खते

कांदा पीक उत्पादन घेतांना जमिनीचं स्वास्थ नीट ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी रासायनिकखते आणि सेंद्रिय खत यांची सांगड घालणे गरजेचे आहे.

रासायनिक खते

खरीप कांद्याला एकरी ४०:२०:२० किलो नत्र, स्फुरद, पालाश या प्रमाणात तर रब्बी कांदा पिकाला एकरी ४०:२०:३३ किलो नत्र,स्फुरद, पालाश वापर करावा तर दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये गंधक १० किलो प्रति एकर लागवडीला वापरावे गंधक वापरल्याने कांदा साठवणुकीस चांगला होतो व टिकण्यास मदत होते. सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये सल्फेट १० किलो , झिंक सल्फेट ८ किलो शेणखतात किंवा गांडूळ खतात ८ ते दहा दिवस मुरवून द्यावे. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करताना माती परिक्षणानुसार निर्णय घ्यावा. कांद्याची साठवण महत्त्वाची असते. काही जातींची साठवण क्षमता जास्त असते जसे- पूसा रेड, नासिक रेड, बेलारी रेड आणि एन-2-4। एन-53, अर्लीग्रेनो आणि पूसा रत्नार मध्ये साठवण क्षमता कमी असते. अशा जाती ज्यात खाद्य पदार्थ रिफ्रेक्टिव इण्डेक्स कमी असते आणि वाष्पन गति व एकूण वाष्पन अधिक असते त्यांची साठवण क्षमता कमी असते. छोट्या आकाराचे जे कन्द असतात, त्यांच्यात मोठ्या आकाराच्या तुलनेत संग्रहण क्षमता अधिक असते.पिकात नाइट्रोजन युक्त उर्वरक जास्त देण्याने कन्दांची संग्रहण क्षमता कमी होते. फाॅस्फरस आणि पोटाशचा महत्त्वपूर्ण प्रभाव नाही होत. जाड मानेच्या कन्द संग्रहण मध्ये शीघ्र ही खराब होतात.

काढणी

विविध जाती

पूसा रेड, नासिक रेड, बेलारी रेड आणि एन-2-4। एन-53, अर्लीग्रेनो आणि पूसा रत्नार या कांद्याच्या विविध जाती आहेत.

वापर

भारतात अनेक राज्यांमध्ये कांद्याचा वापर रोजच्या आहारात केला जातो. कच्च्या कांद्याला उग्र वास आणि चव असते, परंतु तो शिजवला असता त्याची चव बदलून गोडसर होते. कांद्याची भाजी केली जाते. तसेच तोंडी लावणे, कोशिंबीर, चटणी यात कच्च्या कांद्याचा उपयोग होतो. कांद्याच्या पातीपासूनसुद्धा भाजी, झुणका इ. पदार्थ केले जातात.

संदर्भ