कांडेचोर
कांडेचोर (Asian palm civet) | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
कांडेचोर | ||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||
| ||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||
पॅराडॉक्झ्युरस हर्माफ्रोडिटस पल्लास, १७७७ |
कांडेचोर (इतर नावे: काळमांजर , काळजा) हा एक सस्तन प्राणी आहे.
वर्णन
कांडेचोर हा प्राणी मांसाहारी आणि निशाचर आहे. याचा रंग काळसर असतो. याच्या अंगावर काळे जाड केस असतात. त्याच्या अंगाएवढीच त्याची शेपटीही लांब असते.
आढळ
कांडेचोर हा प्राणी भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश, तसेच आग्नेय आशियाई देशांमध्ये आढळतो.
रहिवास
कांडेचोर हा प्राणी दिवसा झाडांच्या फांद्यांवर किंवा ढोलीत झोपतो. तो रात्री भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतो.
अन्न
कांडेचोर हा प्राणी मुख्यतः गोड पदार्थ, फळे, किडे इ. खातो.
जाती
कांडेचोराच्या दोन जाती आढळतात.
- काळा कांडेचोर
- तपकिरी कांडेचोर