कांजिण्या
कांजण्या हा प्रामुख्याने लहान मुलांचा आजार आहे. हा आजार एकदा येऊन गेला, की परत होत नाही. पण काही व्यक्तींमध्ये हे विषाणू सुप्तावस्थेत राहतात आणि प्रौढावस्थेत 'नागीण' या रोगाद्वारे प्रकट होतात.व्हारीसोला झोस्टर या विषाणूमुळे हा रोग होतो,म्हणजे हा विषाणूजन्य आहे.
कारणे
हा आजार व्हेरिसेला झोस्टर(Varicella zoster virus (VZV) या विषाणुंमुळे होतो. कांजिण्या (चिकन पॉक्स) हा एक सामान्य पण वेगाने पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. बहुतेक वेळा याची लागण लहान मुलाना होते. पण प्रौढाना सुद्धा कांजिण्याची लागण झाल्याचे आढळून आले आहे. कांजिण्यामधे खाजणारे बारीक पुरळ त्वचेवर येतात. हे पुरळ आठवडभर राहतात. रुग्णास त्याबरोबर तापही येतो. एकदा कांजिण्या झाल्या म्हणजे रुग्णामध्ये कांजिण्याविरुद्ध आयुष्यभर टिकून राहील एवढी प्रतिकारशक्ती तयार होते. कांजिण्या झाल्याचे लक्षणावरून त्वरित घ्यानात येते. रुग्ण दिसायला विचित्र दिसला तरी ठरावीक कालावधी मध्ये तो बरा होतो. सहसा रुग्णास हॉस्पिटलमधे दाखल करावे लागत नाही. घरी उपचार केले तरी चालतात. आजारामध्ये गुंतागुंत झाल्यास वैद्यकीय मदतीची गरज भासते.
कांजिण्या हा वॅरिसेल्ला- झोस्टर या विषाणूमुळे ( हर्पिस विषाणू कुलातील ) होणारा आजार आहे. रुग्णाशी प्रत्यक्ष संपर्क येणे किंवा हवेमधून याचा प्रसार होतो. संसर्ग झाल्यानंतर विषाणूचा परिपाक काल 10-21 दिवसांचा आहे. त्यानंतर आजाराची लक्षणे दिसू लागतात. अंगावर पुरळ येण्याआधी दोन दिवस रुग्णापासून इतराना संसर्ग होऊ शकतो. अंगावर पुरळ येऊन त्यावर खपली धरेपर्यंत रुग्ण विषाणूचा वाहक असतो. पुरळ ये ऊन त्यावर खपल्या धरेपर्यंतचा काल सु. सात दिवसांचा असतो. प्रौढामध्येहा कालावधि अधिक असतो. कांजिण्या झालेल्या मुलाना सात दिवस शाळेपासून दूर ठेवण्याचा सल्ला यामुळे दिला जातो. अंगावरील पुरळांच्या सर्व खपल्या पडून जाईपर्यंत थांबण्याची फारशी गरज नसते.
वाढत्या मुलांच्या आयुष्यामधील कांजिण्या हा एक सामान्य आजार आहे. नागरी भागामधील नऊ ते दहा वयोगटातील 80-90% मुलाना कांजिण्या येऊन गेलेल्या असतात . सध्या कांजिण्यावरील लसीला नागरी भागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ग्रामीण भागातील मुलाना कांजिण्याची प्रतिकारशक्ती तयार झालेली नसते. कारण कांजिण्याची तीव्रता कमी अधिक असली तरी एकदा कांजिण्या हो ऊन गेल्यानंतर आयुष्यभर पुन्हा कांजिण्या होत नाहीत. प्रौढामध्ये कांजिण्याची तीव्रता अधिक असते. कधीकधी प्रौढामधील कांजिण्यामुळे गुंतागुंतीचे आजार होऊ शकतात. कांजिण्यामुळे झालेल्या मृत्यूमधील निम्म्याहून अधिक व्यक्ती प्रौढ असतात.
कारणे आणि लक्षणे
कांजिण्या कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय दिसणारा आजार आहे. बरेना वाटणे आणि थोडा तापाने त्याची सुरुवात होते. काहीं तासात किंवा एकदोन दिवसात डोके, मान किंवा शरीराच्या वरील भागामध्ये तांबूस रंगाचे लहान पुरळ येण्यास प्रारंभ होतो. पुढील 12ते 24 तासात पुरळावर खाज सुटते,पुरळ पाण्याने भरतात. दोन ते पाच दिवसात त्यांच्या संख्येत वाढ होते. त्वचेवर जुन्या पुरळाबरोबर नवे येतच राहतात. कधी कधी शरीराच्या सर्व त्वचेवर पुरळ उठतात. काही रुग्णामध्ये तोंडाच्या आतील बाजूस, नाकामध्ये, कानामध्ये आणि योनिमार्ग आणि गुदमार्गात पुरळ उठतात. काहीं रुग्णामध्ये पुरळांची संख्या कमी असते. पण शरीरावर 250-500 पुरळ येणे ही सर्वसामान्य बाब आहे. कालांतराने पुरळावर खपली धरते. खपल्या पडून जातात. पुरळ खाजविले नाहीत तर त्वचेवर डाग पडत नाहीत. खाजविल्याने पुरळामध्ये जंतुसंसर्ग होतो. कधीकधी पुरळ आलेल्या ठिकाणी त्वचा अधिक काळवंडते. खाजेचे प्रमाण कमी अधिक असते. काही कांजिण्याच्या रुग्णामध्ये डोकेदुखी, ताप , पोटदुखी अशी लक्षणे दिसतात. पाच ते दहा दिवसात रुग्ण पूर्ण बरा होतो. प्रौढ रुग्णामध्ये रोगाची तीव्रता वाढते.
कांजिण्या हा काळजी करण्यासारखा आजार नसला तरी कधी कधी रुग्णामध्ये गुंतागुंत होऊ शकते. पुरळामध्ये न्यूमोनिया, अतिसार, मेंदू ज्वर, आणि काविळीचा संसर्ग झाल्यास गंभीर परिस्थितिओढवू शकते. 1. अर्भक- एका वर्षाहून लहान अर्भकास कांजिण्या झाल्यास रुग्ण गंभीर स्थितीत जातो. या वयातील रुग्णामध्ये कांजिण्याने मृत्यू ओढवण्याची शक्यता असते . काहीं वेळा आईस प्रसूतिपूर्वी कांजिण्या झाल्यास अर्भकास मेंदूची वाढ पुरेशी न होण्याने बालकाच्या मृत्यूची शक्यता असते. गर्भधारणेनंतर लगेचच आईस कांजिण्या झाल्यास बालकाच्या वाढीवर परिणाम होतो. अशा बालकामध्ये जन्मजात दोष उद्भवण्याची शक्यता असते. 2. प्रतिकारशक्ति विरहित बालके- जनुकीय घटकामुळे , वैद्यकीय उपचाराने किंवा आजारामुळे ज्या बालकांची प्रतिकारशक्ति झाली आहे अशा रुग्णामध्ये कांजिण्याचे गंभीर स्वरूप होतात. कांजिण्यामुळे झालेल्या मृत्यूचे हे दुसऱ्या क्रमांकाचे कारण आहे. 3. प्रौढ आणि 15 वर्षाहून अधिक वयाचे रुग्ण- कांजिण्या झालेल्या प्रौढ रुग्णामध्ये आजारचे स्वरूप गंभीर असल्याने आजाराची गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असते. अधिक संवेदनशील असणा-या वरील रुग्णांची उपचारादरम्यान अधिक काळजी घ्यावी लागते.
निदान
लहान मुलांची बाबतीत कांजिण्याचे निदान घरी, शाळेतील परिचारिका, ग्रामीण भागात नोंदणी झालेली परिचारिका, आरोग्य सेविका , शिक्षक यांचाकडून होते. काहीं संशयास्पद वाटल्यास वैद्यकीय सल्ला टेलिफोनवरून मिळू शकतो. तातडीची वैद्यकीय मदत मिळविण्यासाठी काहीं गोष्टींची खात्री करावी
- रुग्णाचा ताप 102 डि फॅहून अधिक ( 39.2 सें) . ताप चार दिवस उतरत नसेल
- रुग्णाच्या त्वचेवरील पुरळामध्ये इतर संसर्ग झाल्याची शंका आल्यास.
- मानसिक दृष्ट्या रुग्ण मंद, गोंधळलेले, प्रतिसाद देण्यास अक्षम, सतत झोप येणारे, आढळल्यास. मान ताठ होणे, तीव्र उजेडाकडे पाहण्यास टाळाटाळ करणे- उदा.खिडक्या उघडूना देणे, चालताना तोल जाणे, सतत खोकला येणे, छातीत दुखण्याची तक्रार, उलट्या आणि फिटस आल्यास ही मेंदू ज्वराची किंवा रेये सिंड्रोमची लक्षणे असल्याची शक्यता आहे. अशी स्थिति ओढवल्यास रुग्ण गंभीर आहे असे समजावे.
उपचार
कांजिण्यावर उपचार घरीच करता येतात. उपचारामध्ये ताप कमी करणे आणि बरे होण्यास मदत करणे एवढ्या दोन बाबींचा समावेश आहे. कांजिण्या हा विषाणूजन्य आजार असल्याने प्रतिजैविके ॲंेटिबायोटिक्स देऊन उपयोग होत नाही. अंगावर ओल्या कापडाच्या पट्ट्या ठेवणे किंवा रुग्णास थंड अथवा कोमट पाण्याने स्नान घालण्याने अंगाची खाज कमी होण्यास मदत होते. आंघोळीच्या पाण्यात शंभर ग्रॅम खाण्याचा सोडा ( हे प्रमाण टबभर पाण्याचेआहे ). आणि दोन कप ओट मील घालून स्नान करावे. ( भारतामध्ये बादलीभर पाण्यात एक चहाचा चमचा खाण्याचा सोडा आणि चमचाभर डाळीचे पीठ घालावे. सौम्य साबणाचा वापर करावा. अंघोळीनंतर अंग टिपून घ्यावे. पुसू नये. कॅलॅमिन सारखे लोशन लावल्यास खाज कमी होते. खाजविल्यानंतर जंतुसंसर्ग होत असल्याने रुग्णाची नखे कापून घावीत. मोठ्या वयाच्या मुलाना खाजवू नका अशी सूचना द्यावी. अगदी लहान मुलांच्या हातास मऊ कापड बांधून ठेवावे.
तोंडामध्ये पुरळ उठल्यास पाणी पिणे किंवा अन्न गिळणे कठीण होते. अशा वेळी थंड पेये, सरबते,मऊ खीर, लापशी असे सहज गिळता येतील असे पदार्थ खाण्यास द्यावेत. डॉक्टरच्या सल्ल्याने योनिमार्ग किंवा शिश्नावरील पुरळावर जंतुनाशक क्रीम लावावे. पुरळामध्ये जंतुसंसर्ग झाल्यास प्रतिजैविके वैद्यकीय सल्ल्याने वापरावीत. ॲेसीटॅमिनोफेन किंवा इतर तत्सम ॲस्पिरिन विरहित औषधाने ताप कमी होतो. ॲयस्पिरिन किंवा इतर सॅलिसायलेट गटातील औषधे कांजिण्याच्या रुग्णाना देऊ नयेत. ॲ स्पिरिनच्या वापराने कांजिण्याच्या रुग्णामध्ये ‘ रेये सिंड्रोमची लक्षणेदिसू लागतात. रुग्णास नेमके कोणते औषध द्यावे यासाठी योग्य वैद्यकीय सल्ला घ्यावा. जन्मजात प्रतिकारशक्ती क्षीण असलेल्या रुग्णाना ॲेसिक्लोव्हिर हे विषाणूप्रतिबंधक औषध देतात. झोव्हिरॅक्स सुद्धा अपेक्षित परिणाम साधते. पण झोव्हिरॅक्सच्या सार्वजनिक वापरावर अजून तज्ञांचे एकमत झालेले नाही.
पर्यायी उपाययोजना
कांजिण्यामुळे आलेला ताप इतर त्रास यावर पर्यायी उपाय योजना करण्यात येते. थंड किंवा कोमट पाण्याने स्नान. पाण्यात रोल्ड ओटस घातल्याने त्यामधील बीटा ग्लुकॅन हे विद्राव्य तंतू पाण्यात विरघळतात. या विद्राव्य तंतूमुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. रोल्ड ओटसची पुरचुंडी पाण्यात सोडून ठेवल्यास त्यातील विद्राव्य पदार्थ पाण्यात उतरतो. या पाण्याने खाज कमी होते. खाज कमी करण्यासाठी कोरफडीचा गर अंगावर लावतात. कॅलॅंडुला नावाचे होमिओपॅथीमधील एक औषध खाज कमी करण्यासाठी प्रभावी आहे. याशिवाय एमेटिक ( ॲोन्टिमोनियम टार्टारिकम) पॉयझन आयव्ही आणि गंधकयुक्त औषधांचा चांगला उपयोग झाल्याचे आढळून आले आहे.
अनुमान
बहुतेक रुग्णामध्ये कांजिण्या आठवड्याभरात बरी होते. कांजिण्या बरी झाल्यानंतर काळजी घ्यावी लागत नाही. कांजिण्या झाल्यानंतर वीस टक्के पन्नाशीच्या पुढील व्यक्तीमध्ये दीर्घ मुदतीचे परिणाम शरीरावर शिल्लक राहतात. हर्पिस जातीच्या विषाणूचे वैशिष्ट्य म्हणजे वॅरिसेला झोस्टर विषाणू कांजिण्या ब-या झाल्या तरी शरीरातून संपूर्णपणे कधीच जात नाही. विषाणू चेता पेशीमध्ये सुप्तावस्थेमध्ये राहतो. दीर्घ काळानंतर तो पुन्हा कार्यरत हो ऊन त्या वेळी त्याचे रूपांतर शिंगल्स नावाच्या आजारामध्ये होते. प्रतिकारक्षमता क्षीण झाल्याचे हे लक्षण आहे. अत्यंत वेदनाजन्य या आजारास हर्पिसया नावानेओळखले जाते. या आजारात चेतांचा दाह होतो. चेतादाहाबरोबर ताप , चेहरा आणि अंगावर पुरळ अशीही लक्षणे दिसतात. हा त्रास सुमारे दहा दिवस होतो. ज्याठिकाणी चेता दाह शिंगल्स मुळे झालाआहे तेथे महिनोन महिने किंवा वर्षे आजारोत्तर वेदना होत राहतात. सध्या शिंगल्स वर दोन प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. व्हॅल्ट्रेक्स आणि फॅमव्हिर. लक्षणे दिसण्यास प्रारंभ केल्यानंतर 96 तासामध्ये ही औषधे दिल्यास हर्पिस विषाणूचे विभाजन थांबते. प्रतिकार यंत्रणा क्षीण झालेल्या रुग्णामध्ये यांचा उपयोग कसा करता येतो यावर पुरेसे संशोधन झाले नाही. फॅमव्हिर अठराहून लहान व्यक्तीस देता येत नाही.
प्रतिबंधात्मक उपाय
व्हेरिसेला झोस्टर इम्युनोग्लोबिन ‘ व्हीझीआयजी’ या नावाचे प्रथिन सध्या कांजिण्या प्रतिबंधक लस म्हणून उपस्थित आहे. लहान मुले आणि प्रतिकारशक्ती क्षीणझालेल्या रुग्णामध्ये आजाराची लक्षणे दिसायला लागल्यापासून 96 तासाच्या आत व्ही झी आयजी इंजेकशन दिल्यास याचा परिणाम दिसून येतो. 96 तासानंतर हे प्रथिन दिल्यास अपेक्षित परिणाम दिसत नाही. नुकत्याच संसर्ग झालेल्या रुग्णाच्या रक्तामधून व्हीझीआयजी गॅमा ग्लोब्युलिन प्रथिन मिळविले जाते. व्हॅरिवॅक्स ही सौम्य विषाणू लस आहे. कांजिण्यापासून 85% संरक्षण देण्यात हे सक्षम आहे. गंभीर प्रकारच्या कांजिण्यापासून 100% प्रतिबंध या लसीने झाल्याचे आढळून आले आहे. इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी एखादा पुरळ एवढीच प्रतिक्रिया शरीराची असते. सेंटर फॉर डिसीझ कंट्रोल यांच्या सूचनेनुसार ही लस सर्व बालकाना 12-18 महिन्यात दिली पाहिजे. (अति संवेदनक्षम बालकांचा अपवाद सोडून) मीझल्स-मम्स- रुबेला लसीकरणाच्या वेळी ही लस दिलीतर योग्य. भारतात पोलिओट्रिपलच्या वेळी. बारा वर्षापर्यंतच्या मुलाना नक्की कांजिण्या आधी झाल्या होत्या की नाही याची खात्री झाली नसेल तर कांजिण्याची लस देता येते. आरोग्य कर्मचारी आणि ग्रामीण आरोग्य सेवक आणि जननक्षम माताना कांजिण्या होण्याची शक्यता अधिक असल्याने कांजिण्याची लस घेणे श्रेयस्कर ठरते. अशा पासून इतराना रोगप्रसार होण्याची शक्यताही अधिक असते. यासाठी हा प्रतिबंधात्मक उपाय करावा.
बारा वर्षांच्या मुलाना कांजिण्याची लस एकदा देणे पुरेसे ठरते. त्याहूनमोठ्या मुलाना आठ आठवड्यानी आणखीएक डोस द्यावा लागतो. सन 2000 मध्ये एका दिन शाळेमध्ये पसरलेल्या कांजिण्याच्या साथीने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडालेली होती. कारण या साठीमध्ये सर्व मुलाना एकदा कांजिण्याची लस दिलेली होती. त्यामुळे 2002 पासून आणखी एकदा लस देणे सुरू झाले. लसीकरणाचे शुल्क वैद्यकीयविमा कंपन्यानी नाकारल्याने अठरा वयापर्यंतच्या मुलांचा लसीकरणाचा खर्च आता अमेरिकन शासन करते. ज्याना कांजिण्याची लक्षणे दिसायला लागली आहेत अशाना व्हेरिवॅक्स दिले जात नाही. जुनाट मूत्रपिंडाच्या –वृक्काच्या आजाराने ग्रस्त असलेल्याना ही लस देणे अपायकारक आहे अशी समजूत होती. पण अशाही मुलाना 2003 पासून ही लस सुरक्षित ठरली आहे. ही माहिती महत्त्वाची ठरण्याचे कारण वृक्क रोपणकेलेल्या रुग्णामध्ये कांजिण्याचा आजार जीवघेणा ठरत होता.
व्हेरिवॅक्स लस गरोदर स्त्रियाना देता येत नाही. लसीकरणानंतर तीन महिन्यानी स्त्रियानी गर्भधारणेचा प्लॅन करावा. कांजिण्याच्या संपर्कात आल्यानंतर जेंव्हा कांजिण्या ऐन भरातअसतो त्यावेळी लसीकरण करावे असा सल्ला दिला जातो. अशावेळी कांजिण्यापासून योग्य प्रतिबंध होतो. अमेरिकन सांसर्गिक रोग सोसायटीच्या म्हणण्याप्रमाणे ज्या प्रौढाना कधीही कांजिण्या झाल्या नाहीतअशा सर्व प्रौढानी कांजिण्याची लस घेऊन प्रतिबंधात्मक उपाय करावेत. प्रारंभीच्या काळात लसीच्या सुरक्षिततेबद्दल आणि परिणामकारकतेबद्द्ल पालकाना शंका होत्या. जसे अधिक राज्यानी आपापल्या शाळेमधील मुलाना लस देण्याबद्द्ल आग्रह धरल्यानंतर लसीकरणाचा विरोध दूर झाला. 2001 मधील कांजिण्या लसीच्या अभ्यासानंतर लसीची परिणामकारकता आणखी एकदा तपासली गेली. सहा वर्षाच्या संशोधनानंतर कांजिण्या हा पहिला मानवी हर्पिस विषाणू लसीकरणाने आटोक्यात आल्याचे सिद्ध झाले. आधी संशय व्यक्त केल्याप्रमाणे लसीकरणानंतर शिंगल्सचा धोका असल्याचे वाटत होते. पण आता अशा रुग्णांची संख्या घटत असल्याचे घ्यानात आले आहे.
रोगलक्षणे
विषाणुची लागण झाल्यानण्तर सुमारे दोन आठवडयानंतर रोगलक्षणे उमटतात. आजाराच्या सुरुवातीच्या काळात थंडीताप, पाठदुखी, खोकला, सर्दी, डोळे लाल होणे, इत्यादी त्रास होतो. हा त्रास एखादा दिवसच असतो. पण प्रौढ वयात हा त्रास दोन-तीन दिवस टिकतो.
ताप सुरू झाल्यानंतर एक-दोन दिवसांत अंगावर पुरळ उठतात. पुरळ बहुधा छाती, पोट यांवर जास्त असतात. पुरळांची सुरुवात लालीने होते, नंतर त्यात पाणी भरते, मग पू होतो व नंतर खपली धरते. हे सर्व बदल पाच दिवसांतच होतात.
उपचार
हा रोग विषाणुजन्य असल्यामुळे उपचार मुख्यत्वे ताप नियंत्रण व स्वच्छता यावर केंद्रित असते. तापाकरिता तापनाशक औषधे पॅरासिटॅमॉल, Antiviral इत्यादी वापरले जातात.
प्रतिबंधात्मक उपाय
- आजारी व्यक्तीच्या संपर्कात न येणे.
- प्रतिबंधक लसीकरण करून घेणे.