कांजरभट
कांजरभट ही भारताच्या महाराष्ट्र गुजरात,दिल्ली राजस्थान आदी राज्यात राहणारी एक जात आहे. या समाजात पूर्वी हातभट्टीची दारू गाळणे हा प्रमुख व्यवसाय होता. सध्या यापैकी अनेक आजकाल शिक्षण घेत आहेत.
कुप्रथा
या समाजातील मुलींना लग्न झाल्यावर मधुचंद्राचे वेळी अत्यंत कठीण अशी कौमार्य परिक्षा द्यावी लागते.हा एकूण विधी व त्याचे स्वरूप हे या समाजातील मुलींसाठी एक महान समस्याच आहे.यासाठी मधुचंद्राचे रात्री पलंगावर एक पांढरा कपडा अंथरला जातो.त्या कपड्यावर जर रक्त सांडलेले दिसले तर विवाहित मुलगी या परिक्षेत पास.विवाहित मुलास दुसरे दिवशी सकाळी तो कपडा जाहिरपणे दाखवून त्याची घोषणा करायची असते. नापास मुलीस जात-पंचायतीसमोर उभे केले जाते, तिच्यावर नानाविध व अडचणींच्या ठरणाऱ्या प्रश्नांचा भडिमार होतो. त्या समाजाची पंचायत या परिक्षेत नापास होणाऱ्यांवर दंड अथवा एखादी शिक्षा सुनावतात.
या परिक्षेत कॉपी होऊ नये म्हणून मधुचंद्राचे आधी, घरातील ज्येष्ठ महिला सदस्य, विवाहित मुलींने जवळ ब्लेड अथवा सुई इत्यादी तर बाळगले नाही याची याची तिला विवस्त्र करून खात्री करतात.