कांचनगंगा गंधे
डॉ. कांचनगंगा गंधे या वनस्पतीशास्त्राच्या निवृत्त प्राध्यापिका आणि वनस्पतींवर लिहिणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत. २०१० साली त्या सत्तावीस वर्षांच्या अनुभवानंतर निवृत्त झाल्या. त्यांचे एकूण चोवीस शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. डॉ. गंधे यांनी विविध नियतकालिकांमध्ये वन्यसंपत्तीबाबत पाचशे पेक्षा अधिक लेख लिहिले आहेत.
डॉ. गंधे यांनी वनस्पती आणि त्यांचे महत्त्व या संबंधात आकाशवाणीवर शंभराहून जास्त कार्यक्रम केले आहेत. या विषयाच्या अनुषंगाने त्यांचा दूरदर्शनवरील सुंदर माझे घर आणि रानभाज्या आणि त्यांचे उपयोग या कार्यक्रमांमध्ये सहभाग होता.
पुस्तके
- आपले वृक्ष आपली संपत्ती
- आरोग्यासाठी चार्तुमास
- गणेश पत्री
- पर्यावरण आणि वने
- वृक्षवल्ली आम्हा...'