कांग्रा चित्रकला
चित्रकला शैली राजा बलवंत सिंग यांची श्रीकृष्णा आणि राधाची कल्पना | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चित्रकला शैली | ||
---|---|---|---|
| |||
कांग्रा चित्रकला भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील स्थानिक चित्रकला आहे.१८ व्या शतकात मुख्य ठिकाणी म्हणजे बसोहली शाळेत ही चित्रकला दुर्लक्षित होऊ लागली.[१] पण लवकरच पहाडी पेंटिंग शाळेत या कलेला उत्तेजन मिळाले आणि तिचा विस्तार वाढू लागला आणि या कलेला कांग्रा पेंटिंग नावाने संबोधू लागले.
कांग्रा पेंटिंगची मुख्य केंद्र स्थाने गुलर, बसोहली,चंबा,नुरपूर,बिलासपुर,कांग्रा ही होती पण नंतर ती मंडी,सुकेत,कौलु,अर्की,नलगर,तहरी,गरवळ पर्यन्त पोहचली. आणि आता या सर्व केंद्रांना पहाडी पेंटिंग म्हणून संबोधू लागले.[२] भारत देशाचे पहाडी प्रदेशात म्हणजेच हिमालय पर्वतातील उप हिमालय पर्वताचे हिमाचल प्रदेश राज्यात या कलेचे कामकाज चालते म्हणून याला पहाडी पेंटिंग नाव सुचविले होते.[३] पहाडी पेंटिंगचा विकास आणि विस्तार हे कांग्रा स्कूलचे वैशिष्ट्य आहे. इसवी सन १७६५ ते १८२३ या महाराजा संसार चंद यांच्या काळात पहाडी पैंटिंगला त्यांनी राजाश्रय दिला होता आणि त्यामुळे पहाडी पेंटिंग हे महत्त्वाचे केंद्र स्थान होते. आपणा कोणास या पेंटिंगचे उत्कृष्ट नमुने पाहावयाचे असतील तर आपण कांग्रा हिमाचलचे कांग्रा फोर्ट मधील महाराजा संसार चंद वस्तु संग्रहालयाला भेट देऊ शकता. हे वस्तु संग्रहालय कांग्रा येथील एर्स्त-वहिले या राजघराण्याने निर्माण केलेले आहे. कांग्रा पेंटिंग ही पहाडी पेंटिंग स्कूलचा एक भाग आहे त्याचेवर १७ आणि १९ व्या शतकात राजपूत राजवटीचा आधार होता.
इतिहास
ही अतिउत्कृष्ट कला मुळची हिमालय पर्वतातील खालच्या लहानशा डोंगराळ गुलर राज्याची ! जेव्हा १८ व्या शतकाचे पूर्वार्धात (१६९५ ते १७४१) गुलरचे राजे दिलीपसिंह यांचेकडे मुघल पेंटिंग धाटणीची चित्रकला काश्मिरी पेंटर शिकले तेव्हा गुलर पेंटिंगची उत्क्रांती सुरू झाली त्यावेळी तिला कांग्रा कलम म्हणून ओळखले जाऊ लागले. नवीन येणारे लोक स्थानिक कलाकारात मिसळत आणि तेथील डोंगरी वातावरणात प्रभावित होत. इतकच नाही तर तेथील चित्रकारांनी निर्माण केलेली पेंटिंग हुबेहूब केलेली पाहून त्यातील त्यांचे नैपुण्य पाहून दिपुन जात. त्यांनी चित्रकारितेत राधा आणि कृष्ण यांचे प्रणय संबंधाचे विषय कलात्मक रीतीने रेखाटलेले आहेत. सर्व पेंटिंग मध्ये नैसर्गिकता दिसते आणि त्यासाठी गारवा वाटणारा ताजातवाणा रंग भरलेला होता. रंग निवड करताना खाणीतील माती, फळे, मिना याचा अर्क वापरलेला आहे. हिरवीगार दृश्ये, जमिनीवरील रमनिय देखावे, वाहणारे निर्झर, कारंजी अशा लहान सहान बाबींचा ही या पेंटिंग मध्ये समावेश आहे.
विषय
कांग्रा पेंटिंगचा केंद्र बिन्दु श्रीनगर आहे. चित्रित झालेल्या कलाकृती पाहिल्यानंतर लक्षात येते आणि ज्ञात होते की त्या काळातील राहणीमान कसे होते. राधा आणि कृष्ण यांच्या चित्रातून त्यांचे एकमेकावरील प्रेम आणि भक्ति दिसते. भागवत पुराण व जयदेव यांचे गीत गोविंद हे अतिशय प्रसिद्द विषय खूप सुंदर रित्या रेखाटले आहेत. एका प्रसंगात नीळा रंग धारी कृष्ण झाडीत नाचतोय आणि सभोवतालचे जन ते कौतुकाने पहातायत असे चित्र रेखाटले आहे. कृष्णाच्या अनेक लीला वेगवेगळ्या पद्द्तिणे रेखाटलेल्या आहेत. कांग्रा पेंटिंग वर भागवत पुरानातील घटना, कृष्ण काळं, व्रंदावन, यमुना नदी यांचा मोठा प्रभाव आहे. आणखी दुसरे प्रशिद्द विषय म्हणजे नल दमयंती कथा चित्रने रेखाटलेली आहेत.
कांग्रा पेंटिंगची वैशिष्ट्ये
एक मोलाची बाब म्हणजे ही पेंटिंग करताना नयनरम्य हिरवळ रेखाटलेली आहे. ही चित्रे अगदी नैसर्गिक वाटतात. त्याने या पेंटिंग वर खूप भरीव लक्ष केन्द्रित होते. या पेंटिंग मध्ये फुलझाडे,रोपटी, पानझड झालेली झाडे, पाण्याचे ओहोळ, सरपटणारे प्राणी, यांचे सुंदर असे देखावे रेखाटलेले आहेत.
कांग्रा कलाकारांनी रंग संगतीची कल्पना विचारात घेताना अगदी साध्या मूलभूत रंगांचा वापर केलेला आहे उदाहरनच ध्यावयाचे झाले तर चित्राचे वरील दर्शनी भागात गुलाबी रंगाची पेरणी केलेली आहे त्याने तो परिसर दूरवरचा वाटतो.
कांग्रा आर्ट प्रमोशन सोसायटी हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा मध्ये (NGO) या कांग्रा पेंटिंगची जाहिरात मोठ्या प्रमाणावर करण्याचे हाती घेतलेले आहे.[४] NGO या संस्थेच्या स्कूल मध्ये तरुण मुले आणि मुलींना या कलेचे शिक्षण देण्यात येत आहे. खाणीतील विविध रंगी माती आणि भाजीपाल्यातील विविध रंग वापरून पेंटिंग कला अवगत करणे हे येथे आणखी एक काम चाललेले आहे.
संदर्भ
- ^ "दि कांग्रा स्कूल ऑफ पहारी पेन्टिंग".
- ^ "इंडियन मिनिएचर पेन्टिंग सेकशन". 2006-06-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-01-05 रोजी पाहिले.
- ^ "पहारी पेन्टिंग".
- ^ "कांग्रा स्कूल ऑफ पेन्टिंग फूटप्रिंट इंडिया, बाय रोमा ब्राडनॉक".