कहानी
कहानी | |
---|---|
दिग्दर्शन | सुजॉय घोष |
निर्मिती | सुजॉय घोष |
कथा | रितेश शहा |
प्रमुख कलाकार | विद्या बालन परमब्रत चॅटर्जी नवाजुद्दीन सिद्दीकी इंद्रनील सेनगुप्ता |
संगीत | विशाल-शेखर |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | ९ मार्च २०१२ |
अवधी | १२२ मिनिटे |
निर्मिती खर्च | ₹ ८ कोटी |
एकूण उत्पन्न | ₹ १०४ कोटी |
कहानी हा २०१२ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी गूढ थरारपट आहे. कहानीमध्ये भारतीय अभिनेत्री विद्या बालनची आघाडीची भूमिका असून परमब्रत चॅटर्जी व नवाजुद्दीन सिद्दीकी ह्यांच्या सहाय्यक भूमिका आहेत.
कहानीचे कथानक कोलकात्यामधील काल्पनिक घटनांवर आधारित आहे ज्यामध्ये गरोदर असलेली विद्या बालन दुर्गा पूजा काळात आपल्या गायब झालेल्या पतीच्या शोधामध्ये कोलकात्यात पोचते. पुढील घटनांमुळे कथानकामधील गूढ वाढत जाते. कथानकाची अखेर दसऱ्याच्या दिवशी होते.
कहानीची प्रेक्षक व समीक्षकांकडून प्रचंड प्रशंसा झाली व तिकिट खिडकीवर हा चित्रपट सुपरहिट झाला. एकूण ₹ १०४ कोटींचे उत्पन्न मिळवणाऱ्या कहानीला ३ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार व ५ फिल्मफेअर पुरस्कार व इतर अनेक पुरस्कार मिळाले.
पुरस्कार
- फिल्मफेअर पुरस्कार
- सर्वोत्तम दिग्दर्शक - सुजॉय घोष
- सर्वोत्तम अभिनेत्री - विद्या बालन
- आय.आय.एफ.ए. पुरस्कार
- सर्वोत्तम अभिनेत्री - विद्या बालन
- स्क्रीन पुरस्कार
- सर्वोत्तम अभिनेत्री - विद्या बालन
- स्टारडस्ट पुरस्कार
- सर्वोत्तम अभिनेत्री - विद्या बालन
- झी सिने पुरस्कार
- सर्वोत्तम अभिनेत्री - विद्या बालन
बाह्य दुवे
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील कहानी चे पान (इंग्लिश मजकूर)