Jump to content

कवी दत्तकुमार

सूर्यकांत दत्त वैद्य तथा कवी दत्तकुमार हो मराठी कवी होते.

वैद्य हे पुण्याच्या स.प. महाविद्यालयातून मराठी विषयात एम्.ए. झाले व नंतर पुण्याच्याच नूतन मराठी विद्यालयात १९६३—६५ या कालावधीसाठी शिक्षक झाले. त्यानंतर ते वाईच्या काॅलेजात, शिरूर महाविद्यालयात आणि स.प. महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक झाले.

त्यांचे मारवा (१९६४), माझे जग (१९७२) , त्रिमिती (१९८२), सूर्यफुले (१९१८) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत, तर सूर्यकिरण हा संग्रह लवकरच (?) प्रसिद्ध होत आहे.

शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, आणि निवृत्त अशा वेगवेगळ्या कालखंडात लिहिलेल्या त्यांच्या भावकवितांचे आगळेवेगळे स्थान आहे.

त्यांच्या सूर्यफुले या काव्यसंग्रहास आचार्य प्र.के. अत्रे प्रतिष्ठानचा २०१८चा 'कवी केशवकुमार आचार्य अत्रे पुरस्कार' प्राप्त झाला आहे.

सन २०१६ मध्ये 'प्रा. सू.द. वैद्य यांच्या मराठी कविता ' या विषयावर प्रा.डाॅ. बाळकृष्ण लळीत यांच्या मार्गदर्शनाखाली, सौ. कामिनी थोरात यांनी प्रबंध लिहून, पुणे विद्यापीठातून एम् फिल् पदवी प्राप्त केली.