Jump to content

कल्याण वासुदेव काळे


कल्याण काळे
जन्म नाव कल्याण वासुदेव काळे
जन्म १६ डिसेंबर १९३७

डाॅ. कल्याण वासुदेव काळे (जन्म : १६ डिसेंबर १९३७;[]; - १७ जानेवारी२०२१)[]) मृत्यू : १७ जानेवारी २०२१, पुणे[]

हे एक मराठी लेखक आणि मराठी भाषा, साहित्य ह्या विषयाचे अभ्यासक होते. आधुनिक भाषाविज्ञानाचे तज्ज्ञ आणि प्राचीन मराठी साहित्याचे अभ्यासक म्हणून ते परिचित आहेत.[]

काळे हे एम.ए. (संस्कृत), एम.ए. (मराठी) असून त्यांनी १९७८ साली, 'परांड्याचे हंसराज स्वामी: चरित्र, वाङ्मय आणि तत्त्वज्ञान' या विषयावर प्रबंध लिहून पीएच.डी. (मराठी) मिळवली.[] त्यांच्या या प्रबंधाला पुणे विद्यापीठाची डॉ. य.वि. परांजपे आणि कै. न.चिं. केळकर ही दोन पारितोषिके मिळाली होती.

काळे हे पुणे विद्यापीठातल्या मराठी विभागात अधिव्याख्याता होते. त्यांना महाविद्यालयीन व विद्यापीठीय अध्यापनाचा ३१ वर्षांचा अनुभव होता. १९६६ पासून य्यांनी नंदुरबार महाविद्यालय, पश्चिम विभागीय भाषा केंद्र (डेक्कन कॉलेज), पुणे विद्यापीठ या संस्थांत, मराठी साहित्य, संस्कृत, मराठी भाषा आणि भाषाविज्ञान या विषयांचे अध्यापन केले आहे. पीएच.डीचे ते संशोधक मार्गदर्शक होते.त्यांनी १६ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते.[] त्यांनी अनेक ग्रंथांत व विविध वाङ्मयीन नियतकालिकांत लेखन केले आहे.

यशदा, पुणे या संस्थेत काळे आय.ए.एस.च्या विद्यार्थ्यांना अनेक वर्षे मराठी शिकवत असत.[]

ते अमराठी विद्यार्थ्यांना मराठी शिकवत असत.[]

शैलीविज्ञान हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता. मराठीतील अनेक अभिजात साहित्यकृतींचे सौदर्य त्यांनी शैलीविज्ञानाच्या आधारे उलगडून दाखविले होते.[]

कल्याण काळे यांनी लिहिलेली पुस्तके

  • निवडक भाषा आणि जीवन
  • परांड्याचे हंसराज स्वामी : चरित्र, वाङ्मय आणि तत्त्वज्ञान (१९९१)
  • भाषांतरमीमांसा (सहलेखिका - डाॅ. अंजली सोमण) (१९९७)
  • वर्णनात्मक भाषाविज्ञान: स्वरूप आणि पद्धती (सहलेखिका - डाॅ. अंजली सोमण)
  • मराठी अक्षरलेखन
  • लर्निग मराठी
  • Learning Marathi Through English (सहलेखिका - डाॅ. अंजली सोमण)
  • व्यावहारिक मराठी (१९८४)

कल्याण काळे यांनी संपादित केलेली पुस्तके

  • परांड्याचे हंसराज स्वामी यांच्या १४ ग्रंथांचे संपादन काळे यांनी केले. त्यातील १० प्रकाशित आहेत.[]
  • व्यावहारिक मराठी - निराली प्रकाशन, पुणे १९८३ (सहसंपादक - द.दि.पुंडे)
  • ज्ञानेश्वरी अध्याय बारावा - निराली प्रकाशन, पुणे १९८४ (सहसंपादक - द.दि.पुंडे)
  • रसास्वाद - निराली प्रकाशन, पुणे १९८५ (सहसंपादक - द.दि.पुंडे)
  • आकलन - चंद्रकला प्रकाशन, पुणे १९८९ (सहसंपादक - द.दि.पुंडे)
  • वछाहरण - स्नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस, पुणे १९९१ (सहसंपादक - द.दि.पुंडे) []
  • संतसाहित्य : अभ्यासाच्या काही दिशा - डॉ.मु.श्री.कानडे गौरव ग्रंथ (१९९२) (सहसंपादक - रा.शं.नगरकर)
  • आधुनिक भाषाविज्ञान : संरचनावादी, सामान्य आणि सामाजिक (१९९९) []

पुरस्कार व गौरव

  • महाराष्ट्र शासनाचा २०१८ साली डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार
  • भाषा आणि जीवन - कल्याण काळे विशेषांक []

संदर्भ

  1. ^ काळे, १९८२ पृ. २७३.
  2. ^ पुणे विद्यापीठ, २०२१.
  3. ^ a b "कल्याण काळे - व्यक्ती परिचय". भाषा आणि जीवन. वर्ष ३९, अंक ३-४ : (२०२१): ४०.
  4. ^ a b c d e विनायक गंधे. " ज्ञानव्रती डॉ.कल्याण काळे ". भाषा आणि जीवन. वर्ष ३९, अंक ३-४ : २०२१.
  5. ^ काळे, १९८२ पृ. २७३-२७४.
  6. ^ डॉ.अंजली सोमण. "डॉ.कल्याण काळे - विसरता न येणारे कृतार्थ व्यक्तिमत्त्व". भाषा आणि जीवन. वर्ष ३९, अंक ३-४ : २०२१.
  7. ^ द.दि.पुंडे. "विद्वान मित्र आणि गुरूही". भाषा आणि जीवन. वर्ष ३९ : अंक ०३-०४, २०२१.
  8. ^ दिलीप धोंडगे. "कल्याण काळे : एक व्रतस्थ अभ्यासक". भाषा आणि जीवन. वर्ष ३९, अंक ०३-०४, २०२१.

संदर्भसूची

  • काळे, कल्याण आणि सोमण, अंजली (संपा.). वर्णनात्मक भाषाविज्ञान : स्वरूप आणि पद्धती.

बाह्य दुवे

  • पुंडे-काळे ह्या डॉ. द. दि. पुंडे आणि डॉ. कल्याण काळे ह्यांच्या कार्याविषयीच्या संकेतस्थळाचा दुवा.