कल्पना व्यवहारे
डॉ. कल्पना सुरेश व्यवहारे ( इ.स. १९५१; मृत्यू इ.स. २०१४) या मराठीतील एक लेखिका होत्या.[ संदर्भ हवा ] ’डॉ. वसंत वरखेडकर : जीवन सृष्टी आणि वाङ्मयदृष्टी’ या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी पीएच.डी संपादन केली होती. सुरुवातीला, नागपूरजवळील उमरेड येथील नूतन आदर्श महाविद्यालयात त्या मराठीच्या प्राध्यापिका होत्या. त्यानंतर त्यांनी नागपूरच्या ओम सत्यसाई महाविद्यालयाच्या प्राचार्या म्हणून काम पाहिले.
लिहिलेली पुस्तके
- अंतःस्रोत
- अज्ञानातून ज्ञानाकडे
- फुलवा झुलवा
- मिटली रे ही सदाफुली
- शब्दस्वामी
- संवादसेतू