Jump to content

कलानुभव संगीत महोत्सव

कलानुभव संगीत महोत्सव पुण्यात आयोजित होणारा संगीत महोत्सव आहे. हा हा महोत्सव किराणा घराण्याचे प्रख्यात गायक पं. संगमेश्वर गुरव यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने कलानुभव चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित केला जातो. याची सुरुवात इ.स. २०१६मध्ये झाली.

कलानुभव संगीत महोत्सवात किराणा घराण्याच्या नामवंत आणि युवा गायकांच्या संगीत मैफिली होतात. त्यावेळी गायकांना संगमेश्वर गुरव स्मृती पुरस्कार आणि संगमेश्वर युवा पुरस्कार प्रदान होतात. तसेच नृत्य स्पर्धेसाठीही पुरस्कार दिले जातात.