कलानिधीगड
कलानिधी गड, कलानंदीगड किंवी काळानंदीगड हा कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील किल्ला आहे. हा किल्ला कोल्हापूर पासून १४० कि. मी. व बेळगांव पासून ३५ कि. मी. अंतरावर आहे.
हा किल्ला काळ्या पाषाणाचा असून तो एका नंदी प्रमाणे दिसतो म्हणून यास काळानंदी गड असे नाव पडले. शिवाजी महाराजांनी गोवेकरांवर नजर ठेवण्यासाठी बांधलेल्या किल्ल्यांमध्ये हा एक किल्ला आहे.
आजही या गडावर तटबंदी व गोमुखी दरवाजा चांगल्या स्वरूपात असून गडावर भवानी मंदिर ,सदर, दारु कोठार, शौचकुप, पाण्याची टाकी इ. वस्तु पहावयास मिळतात.
जवळची ठिकाणे
पारगड, महिपाल गड, गंधर्वगड, महादेवगड, नारायणगड, तिलारी, अंबोली