Jump to content

कला शाखेतील पदवी

बॅचलर ऑफ आर्ट्स तथा बी.ए. ही विद्यापीठीय अभ्यासक्रमात कला शाखेतील पदवी आहे. अनेक देशांतील शिक्षणप्रणालींमध्ये ही पदवी दिली जाते.

सहसा ही पदवी भाषा, साहित्य, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल, तत्त्वज्ञान अशा विषयांत उच्चशिक्षण घेतल्यावर मिळते. राज्यशास्त्र, समाजशास्त्र यांंसारख्या विषयांंचाही यात अंंतर्भाव होतो.

भारतात या पदवीच्या अभ्यासक्रमासाठी १२वी इयत्ता किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. त्यानंतर सहसा तीन वर्षे अभ्यास केल्यावर बी.ए.ची पदवी मिळते.

काही देशांतून ही पदवी मिळविण्यासाठी चार वर्षांचा अभ्यासक्रम असतो.