Jump to content

कर्नाटक युद्धे

कर्नाटक युद्धे
फ्रेंचांविरुद्ध लढत असताना नवाब अनवरुद्दीन मुहम्मद खानचा मृत्युक्षण (पॉल फिलिपॉटूने काढलेले चित्र)
फ्रेंचांविरुद्ध लढत असताना नवाब अनवरुद्दीन मुहम्मद खानचा मृत्युक्षण (पॉल फिलिपॉटूने काढलेले चित्र)
दिनांक १७४६-१७६३
स्थान कर्नाटक, भारत
परिणती ब्रिटिशांचा विजय
युद्धमान पक्ष
मुघल साम्राज्य
हैदराबादचा निजाम
अर्काटचा नवाब
बंगालचा नवाब
ग्रेट ब्रिटन
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी
फ्रांस
फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी
सेनापती
आलमगीर दुसरा
मुझफ्फर जंग
चंदासाहिब
अनवरुद्दीन मुहम्मद खान
सिराज-उद-दौला
नासिर जंग
रॉबर्ट क्लाइव्हजोसेफ फ्रांस्वा डुप्ले
थॉमस आर्थर, कॉम्ते दि लॅली


कर्नाटक युद्धे यालाच कर्नाटकातील इंग्रज-फ्रेंच संघर्ष असेही म्हणले जाते. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात कर्नाटकातील राजकीय स्थिती बदललेली होती. इ.स. १७६० पर्यंत अर्काट या नवीन मुस्लिम राज्याने बरीच प्रगती साधलेली होती. याच काळात मराठे आणि हैदराबादच्या निजामानेही कर्नाटकात रस घ्यायला सुरुवात केली होती. कर्नाटकातील या राजकीय गोंधळामुळे मद्रास आणि पॉण्डेचेरी या अनुक्रमे इंग्रज व फ्रेंचांच्या वखारीचे रूपांतर युद्धाच्या मैदानात झाले. भारतीय सत्ताधीशांमधील स्पर्धा आणि स्वार्थमूलक कारवाया यामुळे इंग्रज व फ्रेंचांना त्यांच्या भांडणात हस्तक्षेप करण्याची आणि स्वतःच्या वसाहतींचे भले करण्याची संधी मिळाली. यातूनच इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात कर्नाटक़ात इ.स. १७४६ ते इ.स. १७६३ या कालखंडात तीन युद्धे झडली. इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात कर्नाटकात झालेली ही युद्धे कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात.

हे सुद्धा पहा