Jump to content

कर्दळ (सफाळे)

  ?कर्दळ

महाराष्ट्र • भारत
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ.११००५ चौ. किमी
जवळचे शहरसफाळे
जिल्हापालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
१,९७१ (२०११)
• १७,९१०/किमी
भाषामराठी
सरपंच
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• ४०११०२
• +०२५२५
• एमएच४८
बोलीभाषा:आदिवासी, कातकरी, वाडवळी

कर्दळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

सफाळे रेल्वे स्थानकापासून महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ४० सफाळे-रामबाग मार्गाने गेल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र सफाळे गेल्यानंतर लगेचच उजवीकडे हे गाव लागते. सफाळे पूर्व रेल्वेस्थानकापासून हे गाव फक्त एक किमी अंतरावर आहे.

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती तसेच भाजीपाला, फुलभाज्या,फळभाज्यांची लागवड केली जाते.

लोकजीवन

हे मध्यम आकाराचे छोटे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५०४ कुटुंबे राहतात. एकूण १९७१ लोकसंख्येपैकी १००४ पुरुष तर ९६७ महिला आहेत. गावाची साक्षरता ८८.९३ टक्के आहे.पुरुष साक्षरता ९२.९९ आहे तर स्त्री साक्षरता ८४.६० आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २०१ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १०.२० टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात.

नागरी सुविधा

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सफाळे रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. ऑटोरिक्षा सुद्धा सफाळेवरून दिवसभर उपलब्ध असतात.

जवळपासची गावे

कपासे, पारगाव, सोनावे, उचवली,सफाळे, माकणेकापसे, विराथन बुद्रुक, नगावेपाडा, नगावे, चटाळे, भादवे ही जवळपासची गावे आहेत.

संदर्भ

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html