Jump to content

कर्णावती एक्सप्रेस

कर्णावती एक्सप्रेसचा फलक
कर्णावती एक्सप्रेसचा मार्ग

कर्णावती एक्सप्रेस (गुजराती: કર્ણાવતી એક્સપ્રેસ) ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही रेल्वे मुंबईला गुजरातची आर्थिक राजधानी अहमदाबाद शहरासोबत जोडते. ही गाडी मुंबई सेंट्रल व अहमदाबाद स्थानकांदरम्यान रोज धावते व मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचे ४९३ किमी अंतर ७ तास व ४० मिनिटांत पूर्ण करते. कर्णावती एक्सप्रेस गाडीमध्ये केवळ दुय्यम श्रेणीचे आसनकक्ष व वातानुकूलित चेअर कार हे दोनच प्रकारचे डबे असून तिला शयनयान (sleeper) डबे जोडले जात नाहीत. मुंबई व अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या व केवळ खुर्चीयान असलेल्या एकूण ४ गाड्यांपैकी कर्णावती एक्सप्रेस ही एक असून गुजरात एक्सप्रेस, मुंबई अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस व मुंबई अहमदाबाद डबल डेकर एक्सप्रेस ह्या इतर तीन गाड्या आहेत.

मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचा रेल्वेमार्ग विद्युत असल्यामुळे डब्ल्यू.ए.पी.-४ हे विद्युत इंजिन कर्णावती एक्सप्रेसची वाहतूक करते.

तपशील

वेळापत्रक

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१२९३३मुंबई सेंट्रल – अहमदाबाद१३:४०२१:२५रोज
१२९३४अहमदाबाद – मुंबई सेंट्रल०४:५५१२:३५रोज

मार्ग

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे