Jump to content

कर्जत तालुका (अहमदनगर)

कर्जत तालुका
कर्जत is located in अहमदनगर
कर्जत
कर्जत
कर्जत तालुक्याचे अहमदनगर जिल्ह्याच्या नकाशावरील स्थान

राज्यमहाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हाअहमदनगर
जिल्हा उप-विभागकर्जत
मुख्यालयकर्जत

क्षेत्रफळ १५०३ कि.मी.²
लोकसंख्या २०५५८५ (२००१)

तहसीलदार नानासाहेब आगळे
लोकसभा मतदारसंघ अहमदनगर दक्षिण (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघकर्जत-जामखेड
आमदार रोहित पवार
पर्जन्यमान ४१० मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ


कर्जत तालुका, अहमदनगर जिल्हा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्यात राशिन नावाचे एक प्रमुख शहर आहे.अष्टविनायका पैकी एक सिद्धिविनायकाचे मंदिर सिद्धटेक येथे आहे.

राशिन

समस्त राशीन पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे प्रमुख कुलदैवत म्हणून ओळखले जाणारे, ऐतिहासिक स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले असंख्य भाविकांचे अढळ श्रद्धास्थान तसेच राशीन नगरीच्या सांस्कृतिक, वैभवशाली वारशाचे आणि वास्तूश्रीमंतीचे सुंदर प्रतीक म्हणजे "श्री जगदंबा मंदिर"  होय. या मंदिराच्या बांधकामात राष्ट्रकूट, चालुक्य, मोगल, मराठा, पेशवे अशा विविध राजवटीतील वास्तुकलेचा उत्कृष्ट संगम आढळून येतो. तसेच मंदिराचे एकंदरीत बांधकाम कालपरत्वे झाल्याचे देखील समजते. या मंदिरातील हलत्या दीपमाळा या इतिहासकालीन वास्तुकलेची अभूतपूर्व निर्मिती म्हणून सर्वत्र विशेष प्रसिद्ध आहेत. या मंदिराचा जीर्णोद्धार सत्पुरुष श्रीमंत आकोबा स्वामी शेटे ( जंगम ) यांनी  केल्याचे तसेच पेशवाईतील मुत्सद्दी सरदार अंताजी माणकेश्वर गंधे-कुलकर्णी यांनीदेखील मंदिराचे ओवरीकामात देणगी दिल्याचे मंदिरातील शिलालेखांवरून समजते.

श्री जगदंबा मंदिराची रचना साधारण तीन टप्प्यात असून यामध्ये बाहेरील प्रांगण, प्रदक्षिणा मार्ग व सभामंडप यांचा समावेश होतो. मंदिराचे मुख्य महाद्वार पूर्वाभिमुख असून अतिशय भव्य स्वरूपाचे आहे.  या गाभाऱ्यात "श्री यमाई देवीची" स्वयंभू चतुर्भुज तांदळा स्वरूपातील स्वरूपातील शेंदरी रंगातील मूर्ती चैतन्यपूर्ण अशीच आहे. श्री यमाई देवीचे मूळ स्थान माहुरगड निवासिनी रेणुका मातेचे मानले जाते. त्याचप्रमाणे उजव्या बाजूस "श्री तुकाई देवीची" मूळ मूर्ती पाषाणातील असून त्यावर नव्याने वज्रकाम करण्यात आले आहे. श्री तुकाई देवीचे मूळ स्थान तुळजापूर निवासिनी श्री तुळजाभवानीचे मानले जाते. या दोन्ही आदिशक्तीच्या मध्यभागी चौथऱ्यावर चतुर्श्रुंगी देवीची ओतीव कामातील पंचधातूची सिंहासनारूढ चलमूर्ती आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये श्री दुर्गेची उपासना करणारा शाक्त संप्रदाय प्रचलित आहे. स्कंद पुराणातील कथेनुसार महिषासुर राक्षस भगवान शंकराने दिलेल्या वरामुळे अतिशय उन्मत्त होऊन संपूर्ण त्रेलोक्यास त्रास देत असे. यावर सर्व देवादिकांनी आदिशक्तीची उपासना केली असता प्रसन्न होऊन आदिशक्तीने महिषासुराशी नऊ दिवस - नवरात्री घनघोर युद्ध करून त्यास ठार मारले. या महापराक्रमाची साक्ष आणि जगदंबेप्रतीच्या आदराची उपासना म्हणून नवरात्रोत्सव या सोहळ्यास सुरुवात झाली.

परंपरेप्रमाणे अश्विन शुद्ध प्रतिपदा या दिवशी शेटे घराण्यातील मंडळीच्या हस्ते आदिशक्तींची विधीवत महापूजा होऊन सर्वांच्या उपस्थितीत मृत्तिकेच्या वेदीवरती घटस्थापना केली जाते. ढोल - ताशा या मंगल वाद्यांच्या गजरात आईसाहेब.... नावाचा जयघोष करून घटाची व आदिशक्तीची महाआरती होते. यावेळी जगन्मातेकडे सर्वत्र सुख-समृद्धी, पावित्र्य कायम नांदण्यासाठी प्रार्थनारुपी मागणी केली जाते. महाआरतीनंतर निघणाऱ्या धूपारतीचा पेशवाई थाट अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. ललिता पंचमी दिवशी महिलांचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम असतो. या दिवसापासून आदिशक्तीस हत्ती, घोडा, मोर, सिंह, वाघ अशा प्रतिकात्मक वाहनांवर आरुढ केले जाते. तसेच पंचमी, सप्तमी, अष्टमी या दिवशी ग्रामस्थ आदिशक्तीस फुलवाऱ्यांचा नैवेद्य अर्पण करतात. ग्रामजोशींद्वारे चंडीपाठ, दुर्गा सप्तशती, देवी भागवत आदी ग्रंथांचे या काळात नित्य पठण केले जाते. रोज एक याप्रमाणे नवरात्रात विविध सुवासिक फुलांच्या माळा ग्रामस्थ घटास वाहतात. या घटाचे समोर अखंड नंदादीप तेवत ठेवतात. आदिशक्तीस नाग पानांची प्रभावळ ( मखर ) तसेच नारळांचे तोरण देखील बांधले जाते. अष्टमी दिवशी रात्रीचे धुपारती वेळी सर्वांच्या उपस्थितीत मंदिरात पासोडी पोत खेळला जातो. नवरात्र काळात देशमुख मंडळी मंदिरातच घटी बसण्याची प्रथा आहे. तसेच पंचक्रोशीतील लोक देखील व्रतस्थ राहतात. या काळात अनवाणी चालणे, हजामत न करणे, नित्य स्नान, मांसाहार वर्ज्य करणे, पलंगावर न झोपणे, उपवास करणे, अशा प्रकारची व्रत-वैकल्ये केली जातात. नवरात्रातील आकर्षक विद्युत रोषणाई मंदिराच्या सौंदर्यात अधिकच भर टाकते.

समृद्धी मांगल्य आणि ध्येयपूर्ती यांचा त्रिवेणी संगम असणाऱ्या या "विजयोत्सवास" राशीनच्या सांस्कृतिक ऐक्‍यात विशेष स्थान आहे.  या दिवशी परंपरेनुसार आदिशक्ती महानैवेद्य दाखवून विधीवत पूजा करून घटाचे उत्थापन केले जाते. सीमोल्लंघनानंतर रात्री लाखो भाविकांच्या साक्षीने जगदंबेने कौल देताच पालखीस सुरुवात होते. या दिवशी गावात मोठ्या प्रमाणात यात्रोत्सव भरला जातो.  तसेच कोजागिरी पौर्णिमेला ( भाळंदे )  खेळले जाते.

असा हा एकतेचे, बंधुत्वाचे प्रतीक असणारा, वाईट प्रवृत्तींचा सर्वनाश करून  शुभचिंतनाकडे नेणारा, संस्कृतीचे पावित्र्य जपणारा अवघ्या विश्वास आनंद देणारा राशीनचा "विजयोत्सव" अगदी निराळाच संपूर्ण महाराष्ट्रातुन भाविक दर्शनासाठी राशिनला येतात.


सिद्धटेक

नाव- सिद्धटेक (सिद्धिविनायक)

देवता- गणपती स्थान- सिद्धटेक, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र

सिद्धटेक (सिद्धिविनायक) हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.

श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे.अष्टविनायकांमधील हा दुसरा गणपती.


सिद्धिविनायक मंदिर हे भीमा नदीच्या तीरावर आहे, तसेच हे मंदिर पुणे-अहमदनगर या जिल्ह्यच्या सीमेवर आहे, भीमा नदी दोन जिल्ह्याना विभाजित करते, या ठिकाणावरून दौंड शहर २५ किमी अंतरावर आहे, दौंड हा पुणे जिल्ह्यातील एक तालुका आहे.

अहमदनगरच्या कर्जत तालुक्यात असलेले हे मंदिर कर्जत पासून ३८ किमी अंतरावर आहे.

वाटेत जाताना मध्ये राशिन देवस्थान लागते, या ठिकाणी श्री जगदंबा देवीचे मंदिर आहे हे मंदिर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे .

खंडोबा मंदिर (शेगुड)

बारा खंडोबापैकी एक असलेले शेगुड खंडोबा मंदिर एक कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थ क्षेत्रापैकी एक आहे.येथील भव्य जत्रा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.

सीना धरण (निमगाव गांगर्डा)

सीना धरण हे कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा या गावात असून या ठिकाणी उपयुक्त जलसाठा १.८९ TMC असून मृत साठ्यासहित या धरणाची क्षमता ३ TMC इतकी आहे, हे धरण पूर्णपणे भरल्यास कर्जत जामखेड या मतदार संघातील बहुतांश गावांचा शेती प्रश्न सुटतो, हा भाग दुष्काळी असल्या कारणाने पाऊस कधी पडतो कधी नाही, त्यामुळे कुकडी प्रकल्पातील पाणी ओव्हर फ्लो झाल्यास ह्या क्षेत्राला फायदा होतो. कर्जत तालुक्यातील भोसे गावापासून श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव गावापर्यंत 14 किलोमीटर जमिनीखालून बोगदा तयार करून कुकडी प्रकल्पाचे पाणी सीना धरणात सोडले जाते. कुकडी प्रकल्पात एकूण पाच धरणे आहेत डिंभे,माणिकडोह,पिंपळगाव जोगे,वडज व येडगाव. ही सर्व धरणे पुणे जिल्ह्यात असून कुकडी नदीच्या तीरी आहेत त्यामुळे यांना कुकडी प्रकल्प असे संबोधले जाते.या सर्व धरणांनाची एकत्रित क्षमता २९ TMC आहे.शक्यतो दर वर्षी ही धरणे ताकदीने भरतात. याचे ओव्हरफ्लोचे पाणी सीना धरणात सोडल्यास याचा फायदा सीना खोऱ्यातील लोकांना होतो.

=अधिकृत नाव -सीना धरण =धरणाचा उद्देश- सिंचन =अडवलेल्या नद्या/प्रवाह -सीना नदी =स्थान- निमगांव गांगर्डा [ता.कर्जत जि.अहमदनगर] =लांबी- १५८० मीटर =उंची-२८.५ मीटर =बांधकाम सुरू-इ.स. १९८६

=उपयुक्त जलाशय क्षमता:-

       52.30 दशलक्ष घन मीटर
       [1.89 TMC]

=जलसंधारण क्षेत्र -१५८ हजार हेक्टर =क्षेत्रफळ-१२८३४ वर्गमीटर

काळवीट अभयारण्य (रेहकुरी)

रेहेकुरी अभयारण्य हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेले अभयारण्य आहे. ते आकारमानाने अतिशय लहान (२.५ चौ.किमी) असून खास काळवीट हरणांच्या संरक्षणासाठी घोषित केले आहे. येथील जंगल हे शुष्क काटेरी वने या प्रकारात येते. खैर, हिवर, शिसवी, बाभळी, चंदन, बोर, करवंदे घायपात या येथील काही प्रमुख वनस्पती आहेत. अभयारण्याचा बहुतांशी भाग गवताळ येथील हरणांसाठी अन्नाचा प्रमुख स्रोत आहे. महाराष्ट्रतील काळवीट हा हरणाचा प्रकार त्याच्या नागमोडी आणि सुंदर शिंगांसाठी इतर हरणापेक्षा वेगळा उठून दिसतो. नर याच शिंगांद्वारे मादीला आकर्षित करून घेतो

मिरजगाव

कर्जत तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ,अशी मिरजगांवची ओळख आहे, अहमदनगर सोलापूर हाईवे वर वसलेले हे गाव आहे, या ठिकाणी 3 प्रमुख शाळा आहेत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले व मुलींसाठी स्वतंत्र (स्थापना 1924), रूरल एज्युकेशन सोसायटीचे नूतन विद्यालय, हिंद सेवा मंडळाचे भारत विद्यालय, तसेच 2 कॉलेज आहेत महात्मा फुले महाविद्यालय,व शेतकी (ऍग्री) महाविद्यालय (डिग्री व डिप्लोमा) या ठिकाणी आहेत.

मंदिरे- चक्रधर स्वामी तीर्थस्थान मंदिर (तीर्थाचा मळा)

    महादेव मंदिर (तीर्थाचा मळा)
    भैरवनाथ मंदिर 
    काळा मारुती मंदिर 
    पिरसाहेब दर्गा

मिरजगांवचा कापड बाजार प्रसिद्ध आहे, स्वस्तात चांगल्या दर्जाची वस्त्रे येथे मिळतात.बुधवार आठवडा बाजार व बैलबाजार(देशी व संकरीत) प्रसिद्ध

सीना

ना धरणचे मुख्य कार्यालय या ठिकाणी आहे. मिरजगाव पासून तालुक्याचे ठिकाण कर्जत 20 कि.मी अंतरावर आहे.



दुरगाव

दुर्मिळ असे सुयोधन (दुर्योधन) मंदिर दुरगाव तलाव व पोट चारी(कॅनल)

कर्जत शहर

महाभारत काळात पांडव वनवासात असतांना त्यांचा वध करन्याच्या हेतुने सुयोधन(दुर्योधन) व कर्ण त्यांच्या मागे आले होते पांडवांची छावनी पाथर्डीत असतांना सुयोधन(दुर्योधन)ची छावनी व कर्णाची छावनी येथे पडली/थांबली होती कालांतराने सुयोधन(दुर्योधन)ची छावनीच्या जागे/श्रेत्राला दुरगाव, तर कर्णच्या छावनीच्या जागा/श्रेत्राला कर्जत नाव पडले अशी आख्यायिका आहें

श्री गोदड महाराज हे कर्जतचे ग्रामदैवत आहें, महाराजांचे प्रशस्त मंदिर आहें, आषाढ़ एकादशी (कामिका) रोजी महाराजांची यांत्रा भरते, यात्रे दिवसी गावातुन रथाची मिरवणुक निघते दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा हंगामा भरतो, महाराष्ट्रासह परराज्यातुनही अनेक पैवलान व वस्ताद येतात.

अलीकडच्या काळात कर्जत शहराची ओळख शिक्षण पंढरी अशी होत आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या काळात कर्जतच्या भूमिपुत्र दादा पाटील यांच्या सहकार्याने येथे रयत शिक्षण संस्थेचे मोठे शिक्षण संकुल उभे राहिले. आज रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व दादा पाटील महाविद्यालय आज हा वारसा पुढे चालवत आहेत. दादा पाटील महाविद्यालयाच्या NCC विभागाने अनेक उच्चांक स्थापित केले आहेत. शहरात अमरनाथ विद्यालय व समर्थ विद्यालय ही शैक्षणिक संकुले देखील कर्जतच्या शिक्षण संस्कृतीमध्ये मोलाची भर घालताना दिसून येत आहेत.

जिल्हा उप रुग्णालय

बाह्य दुवे

  • "कर्जत तालुक्याचा नकाशा". ८ मार्च २०१८ रोजी पाहिले.