करुणा देव
नीलम प्रभू करुणा देव | |
---|---|
जन्म नाव | करूणा यशवंत देव |
जन्म | एप्रिल २६, इ.स. १९३५ मुंबई, महाराष्ट्र |
मृत्यू | जून ५, इ.स. २०११ मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | आकाशवाणी, निवेदन, नाट्यकलाकार |
प्रसिद्ध नाटक | वाऱ्यावरची वरात |
वडील | हिरामण देसाई |
पती | बबन प्रभू यशवंत देव |
नीलम प्रभू, अर्थात करुणा देव (जन्मनाव नीलम देसाई) (२६ एप्रिल, इ.स. १९३५; मुंबई, महाराष्ट्र; मृत्यू: ५ जून, इ.स. २०११; मुंबई, महाराष्ट्र) ह्या मराठी नाट्यकलावंत व आकाशवाणी-कलावंत होत्या. त्यांचा पहिला विवाह नाटककार बबन प्रभू यांच्याशी झाला होता. बबन प्रभूंच्या मृत्यूनंतर त्यांनी संगीतकार यशवंत देव यांच्याशी लग्न केले.
कारकीर्द
आकाशवाणीवरील लोकप्रिय झालेल्या 'प्रपंच' आणि 'पुन्हा प्रपंच' ह्या श्रुतिकांमधील मीनावहिनींचा आवाज नीलम प्रभू यांचा होता. पु.ल.देशपांडे ह्यांच्या वाऱ्यावरची वरात ह्या नाटकातील रविवारची एक सकाळ ह्या भागातली त्यांची भूमिकादेखील चांगलीच गाजली होती. आकाशवाणीवरील केवळ 'प्रपंच'च नव्हे तर 'आम्ही तिघी' ह्यासारख्यां श्रुतिकांमधून किंवा 'प्रकाश माक्याचे तेल', 'काय झालं? बाळ रडत होतं.' यांसारख्या जाहिरातीमधून, आणि ’आपली आवड’ सारख्या लोकप्रिय कार्यक्रमाच्या निवेदिका आणि वृत्तनिवेदिका म्हणून त्यांचा आवाज रसिकांच्या चांगलाच परिचयाचा होता. [१]
नाटकातल्या भूमिका
नीलम प्रभू यांनी अनेक नाटकांत कामे केली होती. त्यांतली काही भूमिका अश्या:
- अनिलची आई (नाटकःजबरदस्त)
- बिजली (नाटकः सोन्याचा कळस)
- सारजा (नाटकः झुंजारराव)
- मालती (नाटकः भावबंधन)
- तुळशी (नाटकः राजसंन्यास)
यांशिवाय त्यांनी श्रीमंत, शितू, वाऱ्यावरची वरात आणि दिवा जळू दे सारी रात या नाटकांतही भूमिका केल्या होत्या.
व्यक्तिगत जीवन
पहिले पती बबन प्रभू ह्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी प्रसिद्ध गीतकार व संगीतकार यशवंत देव यांच्याशी विवाह केला. या विवाहानंतर त्यांचे नाव करुणा देव झाले. यशवंत देवांच्या ’देवगाणी’ ह्या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाचे निवेदन काही काळ करुणा देव करत असत.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "व्यक्तिवेध : करुणा देव".[मृत दुवा]
बाह्य दुवे
- "चिरतरुण आवाज". 2011-06-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.