Jump to content

करीमनगर जिल्हा

करीमनगर
కరీంనగర్ జిల్లా(तेलुगू)
तेलंगणा राज्यातील जिल्हा
करीमनगर जिल्हा चे स्थान
करीमनगर जिल्हा चे स्थान
तेलंगणा मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यतेलंगणा
मुख्यालयकरीमनगर
मंडळ१६
क्षेत्रफळ
 - एकूण २,१२८ चौरस किमी (८२२ चौ. मैल)
भाषा
 - अधिकृत भाषा तेलुगु
लोकसंख्या
-एकूण १०,०५,७११ (२०११)
-लोकसंख्या घनता४७३ प्रति चौरस किमी (१,२३० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या ३०.७२%
-साक्षरता दर६९.१६%
-लिंग गुणोत्तर१०००/ ९९३ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघकरीमनगर
वाहन नोंदणी TS–02
संकेतस्थळ


लोअर मनैर धरण जलाशय, करीमनगर

करीमनगर हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१४ सालापूर्वी हा जिल्हा आंध्र प्रदेश राज्याच्या अखत्यारीमध्ये होता. करीमनगर येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. निजाम काळात, सय्यद करीमुद्दीन नावाच्या एलगंडाला किलादाराने गावास करीमनगर हे नाव दिले होते. करीमनगर हे एक प्रमुख नागरी समूह आणि राज्यातील पाचवे मोठे शहर आहे.[][]

प्रमुख शहर

भूगोल

करीमनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ २,१८८ चौरस किलोमीटर (८२२ चौरस मैल) आहे. जिल्‍ह्याच्‍या सीमा उत्तरेला जगित्याल आणि पेद्दपल्ली जिल्हा, दक्षिणेला हनमकोंडा जिल्हा आणि सिद्दिपेट जिल्हा, पूर्वेला राजन्ना सिरिसिल्ला जिल्हा आणि पश्चिमेला जयशंकर भूपालपल्ली जिल्‍ह्यांसह आहेत.

लोकसंख्या

२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या करीमनगर जिल्ह्याची लोकसंख्या १०,०५,७११ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९९३ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६९.१६% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या ३०.७२% लोक शहरी भागात राहतात. करीमनगर जिल्हा प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाचा असून तो भारतामधील २५० सर्वात गरीब जिल्ह्यांपैकी एक आहे.[]

मंडळ (तहसील)

करीमनगर जिल्ह्या मध्ये १६ मंडळे आहेत[]: करीमनगर आणि हुजुराबादा ही दोन महसूल विभाग आहेत.

अनुक्रम करीमनगर महसूल विभाग अनुक्रम हुजुराबाद महसूल विभाग
कोतपल्ली ११ वेमवांका
करीमनगर १२ व्ही.सैदापूर
करीमनगर (ग्रामीण) १३ शंकरपट्टनम
मनमकोंढूर १४ हुजुराबाद
तिम्मापूर १५ जम्मीकुंटा
गिनरवरम १६ एलांठाकुंटा
गंगाधरा
रामादुगु
चोपदंडी
१० चिगुरूमुडी

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Telangana gets 31 districts to spruce up adminstration". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत). 2016-10-11. 2022-01-27 रोजी पाहिले.
  2. ^ "About District | Karimnagar | India" (इंग्रजी भाषेत). 2022-01-27 रोजी पाहिले.
  3. ^ "Ministry of Panchayati Raj A NOTE ON THE BACKWARD REGIONS GRANT FUND PROGRAMME" (PDF). 2012-04-05 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2022-01-27 रोजी पाहिले.
  4. ^ "Mandals and Villages | Karimnagar | India" (इंग्रजी भाषेत). 2022-01-27 रोजी पाहिले.

बाह्य दुवे