Jump to content

करसनदास मुळजी

करसनदास मुळजी

करसनदास मुळजी (जन्म : २५ जुलै १८३२; - २८ ऑगस्ट १८७५) हे एक भारतीय पत्रकार होते. १८५७ च्या बंडानंतर थोड्याच दिवसात इंग्लंडला जाऊन तिथल्या प्रवासाच्या गुजरातीत केलेल्या वर्णनाकरता ते ओळखले जातात. हे त्यांचे पुस्तक १८६५ साली प्रकाशित झाले. या त्यांच्या प्रवासवर्णनाचा भास्कर हरी भागवत यांनी केलेला मराठी अनुवाद १८६५ साली इंग्लंडातील प्रवास या नावाखाली प्रसिद्ध झाला. हे मराठी भाषेतील पहिले प्रवासवर्णन म्हणले जाते. याशिवाय मुळजी “सत्यप्रकाश” (की सत्यार्थप्रकाश?) नावाचे नियतकालिक चालवीत असत. विधवा पुनर्विवाहाच्या समर्थनात व तत्कलीन संस्थानिकांच्या भ्रष्टाचाराविरुद्धदेखील मुळजी यांनी लिखाण केले आहे.

डॉ. अनिल अवचट यांनी आपल्या "संभ्रम' या पुस्तकात गुजराथमधील वल्लभ नावाच्या साधूंचा पुष्टीसंप्रदायची एक मनोरंजक हकीकत सांगितली आहे. हे वल्लभ साधू स्वतःस कृष्ण समजत आणि बायका स्वतःस राधा समजून सर्वतऱ्हेच्या क्रीडा ते करत. मोठमोठ्यांच्या बायका यांच्या नादी लागू लागल्या, तेव्हा इ.स. १८६२ च्या सुमारास करसनदास मुळजी यांनी आपल्या "सत्यार्थप्रकाश' या पत्रातून जोरदार टीका चालविली. तेव्हा वल्लभपंथी साधूंनी त्यांच्यावर खटला भरला. त्या खटल्यात डॉ. भाऊ दाजी लाड यांची डॉक्टर म्हणून साक्ष झाली. वकिलाने त्यांना या साधूंना ओळखता का, असे विचारता ते म्हणाले, "होय. त्यांच्यावर औषधोपचार करण्यासाठी मी त्यांच्याकडे जात असतो.' "कोणत्या रोगासाठी?' असे विचारता, वैद्यकीय नीतिमत्तेमुळे त्यांनी उत्तर नाकारले. पण न्यायमूर्तींच्या सांगण्यावरून त्यांनी शेवटी सांगितले, "गुप्तरोगासाठी मी त्यांच्यावर उपचार करतो.'!!

करसनदास मुळजी यांच्या 'इंग्लडातील प्रवास' या पुस्तकाचा परिचय प्राचीन हिदू लोकांत प्रवासाची चाल[permanent dead link] या ठिकाणी सापडेल.

माथेरानमधील ग्रंथालय

माथेरानला शतक महोत्सवी परंपरा असलेले करसनदास मुळजी म्युनिसिपल वाचनालय आहे.