करवत
करवत (इंग्लिश: saw, सॉ ;) हे एक हत्यार आहे. ही एक प्रकारची दातेरी सुरी असते. या द्वारे लाकूड किंवा इतर पदार्थ कापता येतात.
प्रकार
वेगवेगळ्या कारणांसाठी निरनिराळ्या आकारांच्या करवती वापरल्या जातात.
तसेच घरगुती करवतीं सोबत औद्योगिक करवतीही असतात. जसे की मोठ्या प्रमाणात लाकूड कापण्यासाठी गोलाकार पट्टीसारखी करवत एका मोटरवर सतत फिरत असते. त्याद्वारे कापणी सहज होते. लोखंड किंवा पोलाद कापण्यासाठी सतत एकाच भागावर चालत राहील अशा यांत्रिक करवती असतात. त्यासाठी करवतीच्या दातांची रचनाही वेगळ्याप्रकारे केलेली असते.
हे सुद्धा करवतींचे प्रकार मानता येतील.
झीज
करवतीच्या दातांची झीज होऊ नये यासाठी कठिण पदार्थांचे लेपन यांत्रिक करवतीवर केलेले असते.
हे सुद्धा पहा
- डायमंड कटींग हत्यारे
- लाकडाची वखार
- धार
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- पात्याविषयी माहिती (इंग्रजी मजकूर)
- पात्याविषयी माहिती (इंग्रजी मजकूर)
- दातांचे आकार (इंग्रजी मजकूर)
- दातांची संख्या (इंग्रजी मजकूर)