कमिल मिस्झल
कमिल मिस्झल (७ मार्च, १९९० - क्रॅसिक, पोलंड - ) हा एक पोलिश चित्रपट दिग्दर्शक आहे.[१] त्याने द मायर आणि द वुड्स या नेटफ्लिक्स मालिकांचे सह-दिग्दर्शन केले होते. त्याला २०१९मध्ये स्टार एझलिकचा सर्वोत्कृष्ट साहाय्यक दिग्दर्शक या पुरस्काराने गौरविण्यात आले.[२]
कारकीर्द
कामिलने आपल्या कारकिर्दीची सुरुवात २०१६ साली ब्लू डोअर ॲन्ड रेड कॅप्टन या चित्रपटात साहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली. २०१७ मध्ये तो व्होल्टा चित्रपटात ज्युलियस माचुलस्की अंतर्गत साहाय्यक दिग्दर्शक होता, आणि त्याच वर्षी त्याने अमोक या चित्रपटाचे दिग्दर्शिन केले..सन २०१९ मध्ये त्याने नेटफ्लिक्सबरोबर काम केले आणि पॉलिश दूरचित्रवाणी मालिका दि मिरचे दिग्दर्शन केले. २०२०मध्ये त्यांनी द वुड्स ही दूरचित्रवाणी मालिका दिग्दर्शित केली.[३]
फिल्मोग्राफी
चित्रपट | वर्ष | भूमिका |
---|---|---|
बिहाईन्ड द डोअर | २०१६ | साहाय्यक संचालक |
रेड कॅप्टन | २०१६ | साहाय्यक संचालक |
व्होल्टा | २०१७ | साहाय्यक संचालक |
अमोक | २०१७ | संचालक |
मालिका | वर्ष | भूमिका |
---|---|---|
द मायर | २०१९ | संचालक |
द वुड्स | २०२० | साहाय्यक संचालक |
पुरस्कार
इन्स्पायर मासिकाने पुरस्कृत केलेल्या आघाडीच्या ५० क्रिएटिव्ह दिग्दर्शकांमध्ये स्थान
स्टार एझलिकचा सर्वोत्कृष्ट साहाय्यक दिग्दर्शक पुरस्कार
संदर्भ
- ^ "आयएमडीबी वर मिस्झल". आयएमडीबी. २०२१-०३-२७ रोजी पाहिले.
- ^ "Poland's Kamil Misztal Has Come A Long A Way In His Career, Directed An Original Web Show For Netflix". in.news.yahoo.com (इंग्रजी भाषेत). 2021-03-27 रोजी पाहिले.
- ^ "Poland's Director Kamil Misztal Talks About His Multiple Collaborations With Netflix". IWMBuzz (इंग्रजी भाषेत). 2021-03-23. 2021-03-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-03-27 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
कामिल मिसझल आयएमडीबीवरील