Jump to content

कमळ (नेलुंबो)

कमळ
निलुंबो नुसिफेरा
निलुंबो नुसिफेरा
शास्त्रीय वर्गीकरण
Division: वनस्पती
जात: मॅग्नोलिओप्सिडा
वर्ग: प्रोटिआलिस
कुळ: निलंबियासी
जातकुळी: निलंबो
ॲडान्स.
जीव

निलंबो ल्युटिया (अमेरिकन कमळ)
निलंबो नुसिफेरा (भारतीय कमळ)

नेलुम्बो हे मोठ्या, आकर्षक फुले असलेल्या जलीय वनस्पतींची एक जातकुळी आहे. या कुळातील सदस्यांना सर्वसामान्यपणे कमळ असे म्हणले जाते. नेलुंबो हे दिसण्यास कुमुदिनी उर्फ (वॉटर लिली) कुटुंबातील सदस्यांसारखे दिसतात, परंतु दोन्ही जातकुळी प्रत्यक्षात भिन्न भिन्न आहेत.

कमळाच्या फक्त दोन ज्ञात जिवंत प्रजाती आहेत; नेलुम्बो न्यूसिफेरा हे पूर्व आशिया, दक्षिण आशिया, आग्नेय आशिया येथे उगवते. विशेष म्हणजे हीच प्रजाती अत्यंत प्रसिद्ध आहे. याची फुले मुख्यतः गुलाबी आणि क्वचित पांढऱ्या रंगाची असतात. या वनस्पतीचा पूजेसाठी, खाण्यासाठी तसेच औषधी वनस्पती म्हणून सर्रास लागवड केली जाते. आयुर्वेद आणि पारंपारिक चीनी औषधांमध्ये या वनस्पतीचा उपयोग होतो.

दुसरे कमळ म्हणजे नेलुम्बो ल्युटिया, जे मूळचे उत्तर अमेरिका आणि कॅरिबियन आहे. याची फुले पिवळ्या रंगाची असतात. या दोन अ‍ॅलोपॅट्रिक प्रजातींमध्ये बागायती संकरित उत्पादन करून काही नवीन प्रजाती निर्माण केल्या गेल्या आहेत.

कमळाच्या खोडा-पानाचे वर्णन

साधारणपणे गोडय़ा आणि उथळ पाण्यात वाढणारी ही वनस्पती एक ते दीड मीटर उंच आणि एकाच पातळीत दोन मीटरपर्यंत पसरते. खोड लांब असून पाण्याच्या तळाशी जमिनीवर सरपटत वाढते. पाने मोठी वर्तुळाकार, छत्राकृती, ६०-९० से.मी. व्यासाची असतात. पानाचे देठ लांब असतात. पानावरील शिरा पानाच्या मध्यापासून किरणाप्रमाणे पसरलेल्या असतात. कमळाची पाने आणि फुले पाण्याच्या संपर्कात न राहता पाण्यावर येऊन वाढतात. कमळाचे फूल सुगंधी आणि मोठे असते. फुलांचा रंग जातीिनुसार वेगवेगळा असतो. आपल्याकडे मुख्यतः गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची कमळे आढळतात. कमळाकडे विविध कीटक आकर्षित होत असतात त्यामुळे त्यांतील जैविविधता टिकून राहते

कमळाची पुष्पथाली (कमळकाकडी) आणि बी (कमलाक्ष) यांचा वापर अनेक भारतीय; विशेषतः सिंधी लोक खाण्यासाठी करतात.

वैदिक महत्त्व

वैदिक वाड्मय कमळाचे गुणगान करताना थकत नाही. भगवान.श्रीकृष्णाने गीतेमध्ये कमळाला आदर्श मानून तसे जीवन जगण्याचा उपदेश केला. अनासक्तीचा आदर्श- संसारात राहूनही संसाराच्या दोषांपासून मुक्त राहण्याची जीवन दृष्टी कमळ देते. कमळाचे पान (पद्मपत्र) पाण्यात असूनही पाण्याचा एक थेंबही स्वतःला लागू देत नाही, अशी उपमा दिली जाते.

चित्र दालन

भारतीय कमळाचं फुल आणि त्याची दांडी
पिवळे (अमेरिकी) कमळ
श्वेत कमळ आणि बीजथली
पांढरे (श्वेत) कमळ
कामळाचं पान
बीजथळी आणि बीज
कमळ बीज उर्फ कमळगठ्ठ्याचे मणी

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत