कमलाबाई ओगले
कमलाबाई ओगले (१६ सप्टेंबर, १९१३ - २० एप्रिल, १९९९) या मराठीतील पाककृतिसंग्रहांच्या लेखिका, संपादिका होत्या. त्यांनी संकलित केलेल्या पाककृत्यांचा "रुचिरा" हा संग्रह भरपूर लोकप्रिय झाला.
जीवन
कमलाबाई ओगल्यांचे कुटुंब काही काळ मुंबईत वास्तव्यास होते [१]. त्या काही वर्षे ऑस्ट्रेलियात राहिल्या होत्या.[२]
२० एप्रिल १९९९ रोजी पुण्यात वार्धक्यामुळे ओगल्यांचे निधन झाले [१].
प्रकाशित साहित्य
कमलाबाई ओगल्यांनी लिहिलेला "रुचिरा" हा पाककृतिसंग्रह इ.स. १९७० साली मेहता प्रकाशनाद्वारे प्रकाशित झाला.[३][४] हा संग्रह दोन भागांत प्रकाशित झाला.
संदर्भ व नोंदी
- ^ a b पवार, योगेश. "ओगले व्हिप्ड अप अ पब्लिशिंग मार्व्हल" (इंग्लिश भाषेत). १५ सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ ढवळे, डॉ. विजय. "सिडनीमधील मराठी अधिवेशन". 2013-09-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १५ सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले.
- ^ "When Julie & Julia go Maharashtrian". २० एप्रिल २०२३ रोजी पाहिले.
- ^ बोरगावकर,भाग्यश्री. ""रुचकर' ग्रंथइतिहास". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १५ सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले.