Jump to content

कबूतर

कबूतर
शास्त्रीय नाव कोलंबा लिव्हिया [टीप १]
अन्य नावे hih
कुळकपोताद्य [टीप २]
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश रॉक पीजन [टीप ३],
रॉक डव्ह [टीप ४]
संस्कृत कपोत, नील कपोत

कबूतर, किंवा पारवा (शास्त्रीय नाव:Columba livia, कोलंबा लिविया; इंग्लिश:Rock Pigeon/Rock Dove, रॉक पीजन/रॉक डोव्ह) , ही कपोताद्य कुळातील पक्ष्यांची प्रजाती आहे. हे साधारणतः ३२ सें. मी. आकारमानाचे, निळ्या राखाडी रंगाचे पक्षी असतात. यांच्या पंखावर दोन काळे, रुंद पट्टे असतात, तर याच्या शेपटीच्या टोकावर काळा भाग असतो, मानेवर आणि गळ्यावर हिरवे-जांभळे चमकदार ठिपके असून, पंखाखाली पांढुरका रंग असतो, यांच्या चोची काळ्या रंगाच्या असतात, डोळे आणि पाय लाल रंगाचे असतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात. यांचा आवाज खोल, गंभीर, गूटर-गूं, गूटर-गूं असा असतो.

हा पक्षी रंगाने पांढरा शुभ्र असल्यास त्याला कबूतर आणि पारव्या रंगाचा असल्यास त्याला पारवा म्हणतात.

विणीचा हंगाम जवळ जवळ वर्षभर असतो. वैशिष्टयच म्हणायचं तर पिल्लांना वाढवण्याची पद्धत. पिल्लं अगदी लहान असताना नरमादी त्यांना स्वतःच्या पोटातून येणारा एक प्रकारचा पक्ष्याच्या अनेक उपजाती आहेत, त्यातील कोलंबा लिव्हिया डोमेस्टिका ही उपजात माणसाळलेली, पाळीव असल्याने जास्त परिचित आहे. यांच्यावर आधारलेल्या जगातील सर्व भाषांमध्ये अनेक कथा, कविता, गाणी आहेत. विशेष प्रशिक्षण दिलेली कबुतरे माणसासाठी संदेशवहनाचे काम चोखपणे पार पाडतात. भारतात याच्याविषयी शिबी राजाची कथा प्रचलित आहे.

जगभर आढळ दर्शवणारा नकाशा

हे पक्षी मूलतः युरोप, उत्तर आफ्रिका, आशिया खंडांमध्ये आढळतात. लहान-मोठी शहरे, खेडी, शेतीचे प्रदेश, धान्य कोठारे, रेल्वे स्थानके, जुन्या इमारती, किल्ले, इत्यादी सर्व ठिकाणी हे पक्षी सहजपणे राहू शकतात.

खाद्य

विविध प्रकारची धान्ये हे कबुतरांचे प्रमुख अन्न आहे. ज्वारी, पांढरी करडी, काळे हरभरे, शेंगदाने इ. सर्व मिश्रण.

Columba livia

प्रजनन

कबुतरांचा प्रजनन काळ जवळजवळ वर्षभर आहे. हे पक्षी मिळेल ते साहित्य वापरून घरटे तयार करतात किंवा इतर पक्ष्यांनी सोडून दिलेली घरटी वापरतात.कबुतर दोन अंडी एका वेळी देतात...

बाह्य दुवे


  1. ^ कोलंबा लिव्हिया (रोमन: Columba livia)
  2. ^ कपोताद्य (इंग्लिश: Columbidae, कोलंबिडे)
  3. ^ रॉक पीजन (रोमन: Rock Pigeon)
  4. ^ रॉक डव्ह (रोमन: Rock Dove)