कपिला वात्स्यायन
कपिला वात्स्यायन (२५ डिसेंबर १९२८ - १६ सप्टेंबर २०२०) एक भारतीय शास्त्रीय नृत्य, कला, स्थापत्य आणि कला इतिहासाच्या अग्रगण्य अभ्यासक होत्या. त्यांनी भारतातील संसद सदस्य म्हणून आणि इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्सचे संस्थापक संचालक म्हणूनही काम केले.
१९७० मध्ये, वात्स्यायन यांना संगीत नाटक अकादमी फेलोशिप मिळाली, जो संगीत, नृत्य आणि नाटक यातील संगीत नाटक अकादमीद्वारे प्रदान केलेला सर्वोच्च सन्मान आहे. यानंतर १९९५ मध्ये त्यांना ललित कला अकादमी फेलोशिप प्रदान करण्यात आली. २०११ मध्ये, भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान बहाल केला.
जीवन
वात्स्यायन यांचा जन्म दिल्लीत राम लाल आणि सत्यवती मलिक यांच्या पोटी झाला.[१] त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एमए मिळवले.[२] त्यानंतर, मिशिगन विद्यापीठ येथे शिक्षणात दुसरे एमए आणि बनारस हिंदू विद्यापीठात पीएचडी पूर्ण केली.
कवी आणि कला समीक्षक केशव मलिक हे त्यांचे मोठे भाऊ होते. १९५६ मध्ये त्यांचा विवाह प्रसिद्ध हिंदी लेखक सच्चिदानंद हीरानंद वात्स्यायन 'अज्ञेय' यांच्याशी झाला. पण १९६९ मध्ये ते वेगळे झाले.
कारकीर्द
वात्स्यायन यांनी मातृलक्षणम (१९८८), भारत: द नाट्य शास्त्र (१९९६), आणि द स्क्वेअर अँड द सर्कल ऑफ इंडियन आर्ट्स (१९९७), यासह अनेक पुस्तके लिहिली.[३]
१९८७ मध्ये, त्या दिल्लीतील इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्सच्या संस्थापक विश्वस्त आणि सदस्य सचिव बनल्या.[३][४] त्यानंतर, १९९३ मध्ये त्यांना शैक्षणिक संचालक बनवण्यात आले, जे पद त्यांनी २००० पर्यंत सांभाळले.[५]
त्यांनी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयात सचिव म्हणूनही काम केले आहे, जिथे त्या मोठ्या संख्येने उच्च शिक्षणाच्या राष्ट्रीय संस्थांच्या स्थापनेसाठी जबाबदार होत्या.[६] त्या इंडिया इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली येथे एशिया प्रकल्पाच्या अध्यक्षा होत्या.[६]
२००६ मध्ये त्यांना राज्यसभेच्या सदस्य म्हणून नामांकित करण्यात आले होते. परंतु त्यानंतर मार्च २००६ मध्ये, त्यांनी त्यांचे नफ्याच्या कार्यालय (इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स) न सोडता राज्यसभेतून राजीनामा दिला.[७] एप्रिल २००७ मध्ये, त्यांना राज्यसभेवर नामांकन देण्यात आले होते, ज्याची मुदत फेब्रुवारी २०१२ मध्ये संपुष्टात आली.[८]
कपिला वात्स्यायन यांचे १६ सप्टेंबर २०२० रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी नवी दिल्ली येथे त्यांच्या घरी निधन झाले.[९][१०]
पुरस्कार
वात्स्यायन यांना १९७० मध्ये संगीत नाटक अकादमी फेलोशिप मिळाली.[११] त्याच वर्षी त्यांना युनायटेड स्टेट्स आणि इंडोनेशियामधील सांस्कृतिक संस्था आणि समकालीन कला घडामोडींचे सर्वेक्षण करण्यासाठी जॉन डी. रॉकफेलर तिसरा फंडाकडून फेलोशिप देण्यात आली. १९७५ मध्ये त्यांना प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू फेलोशिप प्रदान करण्यात आली होती.[१२]
१९९२ मध्ये आशियाई सांस्कृतिक परिषदेने त्यांना उत्कृष्ट व्यावसायिक कामगिरी आणि भारतातील नृत्य आणि कला इतिहासाची आंतरराष्ट्रीय समज, सराव आणि अभ्यास यासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल जॉन डी. रॉकफेलर तिसरा पुरस्कार देऊन सन्मानित केले.[१३] २००० मध्ये, त्या राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार प्राप्तकर्ता होत्या[१४] आणि २०११ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषणने सन्मानित केले.[१५]
संदर्भग्रंथ
- कपिला वात्स्यायन; जयदेव (१९८०). Jāur Gīta-Govinda: a dated sixteenth century Gīta-Govinda from Mewar. National Museum.
- कपिला वात्स्यायन (१९८२). Dance Sculpture in Sarangapani Temple. Society for Archaeological, Historical, and Epigraphical Research.
- कपिला वात्स्यायन (१९८७). Traditions of Indian folk dance. Clarion Books associated with Hind Pocket Books. ISBN 9788185120225.
- कपिला वात्स्यायन (१९९१). Concepts of Space: Ancient and Modern. अभिनव पब्लिकेशन्स. ISBN 978-81-7017-252-9.
- कपिला वात्स्यायन (१९९२). Indian classical dance. Publications Division, Ministry of Information and Broadcasting, Govt. of India. ISBN 978-81-230-0589-8.
- कपिला वात्स्यायन; बैद्यनाथ सरस्वती; सुभाष चंद्र मलिक; मधु खन्ना (१९९४). Art, the Integral Vision: A Volume of Essay in Felicitation of Kapila Vatsyayan. D. K. Print World (P) Limited. ISBN 978-81-246-0029-0.
- कपिला वात्स्यायन (१९९५). Paramparik bharatiya rangmanch: anant dharane. National Book Trust. ISBN 978-81-237-1432-5.
- कपिला वात्स्यायन (१९९५). The Indian Arts, Their Ideational Background and Principles of Form. Affiliated East-West Press.
- कपिला वात्स्यायन (१९९५). Prakŗti: The Integral Vision. D K Printworld (P) Limited. ISBN 978-81-246-0036-8.
- कपिला वात्स्यायन (१९९७). The Square and the Circle of the Indian Arts. अभिनव पब्लिकेशन्स. ISBN 978-81-7017-362-5.
- कपिला वात्स्यायन (२००४). Dance in Indian Painting. अभिनव पब्लिकेशन्स. ISBN 978-81-7017-153-9.
- कपिला वात्स्यायन (२००६). Bharata The Natyasastra. Sahitya Akademi. ISBN 978-81-260-1808-6.
- कपिला वात्स्यायन (२००७). Classical Indian dance in literature and the arts. संगीत नाटक अकादमी.
- कपिला वात्स्यायन, ed. (२०११). Transmissions and Transformations: Learning Through the Arts in Asia. प्रायमस बुक्स. pp. 9–. ISBN 978-93-80607-14-6.
- कपिला वात्स्यायन (२०११). The Darbhanga Gita-Govinda. अभिनव पब्लिकेशन्स. ISBN 978-81-7017-447-9.
- कपिला वात्स्यायन (२०११). Asian Dance: Multiple Levels. बी. आर. रिदमस. ISBN 978-81-88827-23-7.
- कपिला वात्स्यायन (२०१३). Plural Cultures and Monolothic Structures. प्रायमस बुक्स. ISBN 978-93-80607-45-0.
संदर्भ
- ^ "Members Biodata". Rajya Sabha. 8 July 2013 रोजी पाहिले.
- ^ Uttara Asha Coorlawala (12 January 2000). "Kapila Vatsyayan – Formative Influences". narthaki. 8 July 2013 रोजी पाहिले.
- ^ a b Bouton, Marshall & Oldenburg, Philip, Eds. (2003). India Briefing: A Transformative Fifty Years, p. 312. Delhi: Aakar Publications.
- ^ "About IGNCA". IGNCA. 6 January 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 July 2013 रोजी पाहिले.
- ^ "Kapila Vatsyayan: Polymath of the arts". Frontline (इंग्रजी भाषेत). 2020-09-22. 2023-08-08 रोजी पाहिले.
- ^ a b "Congress appoints Kapila Vatsyayan as IGNCA chairperson, completes tit-for-tat with NDA". India Today. 31 October 2005. 8 July 2013 रोजी पाहिले.
- ^ "Vatsyayan resigns from RS". Rediff.com India News. 24 March 2006. 8 July 2013 रोजी पाहिले.
- ^ "Swaminathan, Vatsyayan nominated to Rajya Sabha". द हिंदू. 11 April 2007. 1 October 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 July 2013 रोजी पाहिले.
- ^ "'A huge void in the art and culture world': Indians mourn the death of Kapila Vatsyayan". 16 September 2020.
- ^ "Kapila Vatsyayan, grand matriarch of cultural research, passes away". द हिंदू (इंग्रजी भाषेत). 2020-09-16. ISSN 0971-751X. 2023-08-08 रोजी पाहिले.
- ^ "SNA: List of Sangeet Natak Akademi Ratna Puraskar winners (Akademi Fellows)". Official website. 4 March 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Official list of Jawaharlal Nehru Fellows (1969-present)". Jawaharlal Nehru Memorial Fund.
- ^ "ACC: List of John D. Rockefeller 3rd Awardees". Official website. 26 July 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Secularism under assault, says Sonia". द हिंदू. 21 August 2001. 10 November 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Padma Awards Announced" (Press release). Ministry of Home Affairs. 25 January 2011. 25 January 2011 रोजी पाहिले.