Jump to content

कन्नमवार नगर

कन्नमवार नगर हे मुंबई (राज्य : महाराष्ट्र, भारत) उपनगरातील विक्रोळी येथील एक वसाहत आहे. मुंबई उपनगरातील मध्य रेल्वेच्या विक्रोळी स्थानकाच्या पूर्व बाजूस अवघ्या १५ मिनिटांवर पूर्वद्रूतगती महामार्गास लागून ही वसाहत आहे. ६०,७० च्या दशकात वसलेल्या या वसाहतीने आशिया खंडातील सर्वात मोठी आदर्श गृहनिर्माण वसाहत म्हणुन नाव मिळवलेले आहे.

म्हाडाची वसाहत म्हणून कन्नमवार नगर हे ओळखले जाते. जवळपास ३०० च्या आसपास इमारती असलेले हया नगराचे दोन भाग आहेत कन्नमवार नगर १ व २. प्रत्येक इमारतीस स्वतंत्र क्रमांक दिलेले आहेत. येथील बहुतांश इमारती या चार मजली आहेत. विक्रोळी स्थानकापासून कन्नमवार नगरात येण्यासाठी बेस्टच्या बस क्रं ३९४ व ३९७ उपलब्ध आहेत, तसेच ३५४ (कन्नमवार नगर ते शिवाजी पार्क), ३८८ (कन्नमवार नगर ते सीप्झ), १८५ (कन्नमवार नगर ते मजास आगार) या बेस्टच्या बससेवाही उपलब्ध आहेत ज्या कन्नमवार नगर २ स्थित बेस्टच्या बस आगारातून सुटतात.