Jump to content

कन्नदासन

कन्नदासन

कवियरासू कन्नदासन (तमिळ: கண்ணதாசன்) (जून २४, इ.स. १९२७ - ऑक्टोबर १७, इ.स. १९८१) हा तमिळ कवी, गीतकार व लेखक होता. तमिळ चित्रपटांतील गाण्यांसाठी लिहिलेल्या गीतांमुळे कन्नदासनाला प्रचंड लोकप्रियता लाभली. त्याने आपल्या साहित्यिक कारकिर्दीत सुमारे ५,००० गीते, ६,००० कविता व नाटके, महाकाव्ये, निबंधसंग्रह इत्यादी प्रकारांत मोडणारी २३२ पुस्तके लिहिली []. त्याने धर्म व धार्मिक तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून लिहिलेले दशखंडात्मक निबंध अर्थमूल इंदुमतम् (मराठी: सार्थ हिंदुत्व) व येसू काव्यम् या नावाने लिहिलेले येशू ख्रिस्ताचे पद्य चरित्र, या रचनाही वैशिष्ट्यपूर्ण मानल्या जातात.

संदर्भ

  1. ^ "कन्नदासन पदिप्पगम" (इंग्लिश भाषेत). 2011-07-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-24 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे