Jump to content

कन्नड विकिपीडिया

कन्नड विकिपीडिया
कन्नड विकिपीडियाचा लोगो
ब्रीदवाक्य मुक्त ज्ञानकोश
प्रकार ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प
उपलब्ध भाषाकन्नड
मालकविकिमीडिया फाउंडेशन
निर्मितीजिमी वेल्स, लॅरी सॅंगर
दुवाhttp://kn.wikipedia.org/
व्यावसायिक? चॅरिटेबल
नोंदणीकरण वैकल्पिक
अनावरण जून, इ.स. २००३
आशय परवाना क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.०

कन्नड विकिपीडिया ( कन्नड: ಕನ್ನಡ ವಿಶ್ವಕೋಶ) किंवा कानडी विकिपीडिया ही विकिपीडियाची कन्नड भाषेतील आवृत्ती आहे. ही आवृत्ती जून २००३ मध्ये सुरू झाली आणि २०२१ पर्यंत माफक प्रमाणात सक्रिय आहे, त्यात १००हून जास्त सक्रिय वापरकर्त्यांसह २५,०००हून जास्त लेख आहेत.[] तसेच, हे भारतीय उपखंडातील बारावे सर्वाधिक लोकप्रिय विकिपीडिया आहे.[]

कन्नड विकिपीडिया समुदायाने २ एप्रिल २००६ रोजी बेंगळुरूमध्ये बैठक घेतली, ज्याला बरेच वृत्तवार्तांकन प्राप्त झाले.[]

इतिहास

कन्नड विकिपीडियाच्या 9 व्या वर्धापनदिनानिमित्त केक.

१ ऑगस्ट, २००९ पर्यंत या विकीवर जवळजवळ ६,८०० लेख असल्याने ही विकिपीडियाची १०० वी सर्वात मोठी आवृत्ती बनली.

जानेवारी २०१३ पर्यंत, त्यामध्ये ९३ सक्रिय वापरकर्त्यांसह १२,९६१ लेख होते आणि २,६८० प्रतिमा होत्या, त्या वेळी लेखांच्या संख्येनुसार ते १०८ वे विकिपीडिया बनले. 

जानेवारी २०१६ पर्यंत, कन्नड विकिपीडिया हा भारतातील दहावा क्रमांकाचा सर्वात मोठा विकीपीडिया आहे आणि अशा प्रकारे, अन्य भारतीय भाषेतील विकिपेडियामध्ये सर्वात लहान विकिपीडिया होता. प्रशासक ओमशिवप्रकाश लेखांच्या कमतरतेचे कारण, कन्नड भाषिक समुदायात रस नसणे, कन्नड विकिपीडिया आणि कन्नड टायपिंग साधनांविषयी जागरूकता नसणे आणि कर्नाटकच्या काही भागात इंटरनेट सेवा मर्यादित असल्याचे सांगितले आहे आहे.[]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Kannada Wiki finds going tough". October 7, 2014. 11 October 2014 रोजी पाहिले.
  2. ^ Workshops to teach wikipedia editing
  3. ^ "Wikipedia Event Press Coverage" (PDF). 2018-09-22 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2021-04-05 रोजी पाहिले.
  4. ^ Khajane, Muralidhara (19 January 2016). "Kannada Wikipedia not on top of the charts". The Hindu. 29 March 2016 रोजी पाहिले.

पुढील वाचन

बाह्य दुवे