कठपुतळी
कठपुतळी म्हणजे लाकडापासून तयार केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या बाहुल्या. या बाहुल्यांचे हात आणि पाय हे हलविता येतात. त्यांना रंगही दिलेला असतो आणि वेशभूषाही असते. या बाहुल्यांना बारीक आणि लांबून न दिसणारे धागे बांधून त्या नाचविल्या जातात. कठपुतळ्या चालविणारा कठपुतळीकार पडद्याआडून हे काम बोटांच्या व हातांच्या साहाय्याने करीत असतो. तो लोकांना दिसत नाही. बाहुल्यांच्या हालचालीतून नाट्य रंगविले जाते. पडद्यामागे बहुधा दुसरा इसम त्या नाटकातले संवाद बोलत असतो. त्यानुसार, कठपुतळीकार हा बाहुल्या नाचवितो. अशा प्रकारे हालणाऱ्या चालणाऱ्या बाहुल्यांच्या साह्याने एखाद्या नाटकातील वा पुराणातील प्रसंग सादर केला जातो.
वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या प्रकारच्या बाहुल्या बनवून त्या वापरल्या जातात व त्यायोगे लोकरंजन केले जाते.
भारतात हे एक मनोरंजनाचे व लोककलेचे साधन आहे.
मीना नाईक यांचे वाटेवरती काचा गं हे बालकांच्या लैंगिक शोषणवरील बाहुली नाट्य आहे. १४ नोव्हेंबर २००० ते २०१२ पर्यंत या नाटकाचे पाचशेहून अधिक प्रयोग झाले.
के.एस. गोडे हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध बाहुली कलावंत (शब्दभ्रमकार) आहेत. ते या कलेसाठी स्वतःच बाहुल्या बनवतात.
पुणे शहरात ९ मे २०१७ रोजी पहिले बाहुली नाट्य संमेलन झाले. त्यावेळी गोडे यांना जीवनगौरव पुरस्कार दिला गेला.