Jump to content

कट्यार काळजात घुसली (नाटक)

कट्यार काळजात घुसली हे श्री पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित एक मराठी संगीत नाटक आहे. ह्या नाटकातील सर्व पदे सुप्रसिद्ध आहेत. सर्व पदांना पं. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिले आहे. श्री प्रभाकर पणशीकर ह्यांच्या नाट्यसंपदा ह्या संस्थेतर्फे हे नाटक रंगमंचावर सर्वप्रथम सादर केले गेले. []

ह्या नाटकाचा प्रथम प्रयोग २४ डिसेंबर १९६७ला झाला. []

कथानक

या नाटकाचे कथानक दोन घराण्यांतल्या गायकीच्या संघर्षावर आधारित आहे.

कलाकार

या नाटकाच्या कलाकारांच्या प्रथम संचात पं. भार्गवराम आचरेकर ह्यांनी पंडित भानूशंकर ह्यांची तर पंडित वसंतराव देशपांडे ह्यांनी खांसाहेबांची भूमिका साकारली होती. प्रसाद सावकार ह्यांनी सदाशिवची तर फैय्याज ह्यांनी झरिनाची व्यक्तिरेखा साकारली होती. पुढील संचात कलाकार बदलत गेले. प्रकाश घांग्रेकर, बकुळ पंडित, बाळकराम, शंकर घाणेकर इ. कलाकारांनी देखील ह्या नाटकात भूमिका साकारल्या आहेत. []

विविध संचातील प्रयोग

  • अलीकडील काळात भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे यांच्यातर्फे या नाटकाचे प्रयोग केले जातात. चारूदत्त आफळे हे या प्रयोगांमधे खाॅॅंंसाहेबांची मध्यवर्ती भूमिका अभिनीत करतात.
  • २०१० मध्ये डॉ.वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने नाटकाचे पुनरूज्जीवन करण्यात आले. या प्रयोगांमध्ये राहुल देशपांडे, महेश काळे, दीप्ती माटे, अस्मिता चिंचाळकर या अभिनेत्यांचा संच काम करतो. २०१६ साली न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, पुणे येथे या संचाने नाटकाचा शंभरावा प्रयोग सादर केला.
  • दिग्दर्शक: सुबोध भावे

भूमिका:

नाट्यपदे

या संगीत नाटकातील पदे विशेष प्रसिद्ध आहेत. पं. जितेंद्र अभिषेकी यांनी या पदांना संगीत देताना अनेक मूळ बंदिशींचाही वापर केला आहे. 'लागी कलेजवा कटार' ही नाटकातील सर्वात प्रसिद्ध बंदिश श्री दारव्हेकर ह्यांनीच रचलेली आहे. नाटकातील रागमाला आणि अन्य पदांच्या रचनाही दारव्हेकर ह्यांच्याच असून काही बंदिशी आणि चीजा मात्र पारंपारिक आहेत. []

ह्या नाटकातील पदे पुढीलप्रमाणे होत. []

  • मुरलीधर श्याम
  • घेई छंद मकरंद
  • तेजोनिधी लोहगोल
  • सुरत पिया की न छिन बिसराए (पारंपारिक) []
  • लागी करेजवा कटार
  • दिन गेले भजनाविण सारे
  • ह्या भवनातील गीत पुराणे
  • कविराज या पात्रासह सदाशिव, उमा, झरीना या पात्रांनी मिळून सादर केलेली गद्य आणि पद्यमय रागमाला या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणून सांगता येते. तिचीही रचना श्री दारव्हेकर ह्यांनीच केली आहे.[]

ह्या प्रसिद्ध नाटकाच्या प्रथम संचाच्या शंभराव्या प्रयोगाच्या वेळी श्री आचार्य अत्रे अध्यक्षपदी होते. त्यावेळी त्यांनी नाटकासाठी काढलेले गौरवोद्गार पुढीलप्रमाणे - "इतकी सुंदर नाट्यकट्यार मराठी रसिकांच्या काळजात क्वचितच घुसली असेल."[]

संदर्भ

पुस्तक - कट्यार काळजात घुसली, लेखक - पुरुषोत्तम दारव्हेकर, पॉप्युलर प्रकाशन

  1. ^ ऋणनिर्देश, दारव्हेकर पुरुषोत्तम, नाटक- कट्यार काळजात घुसली https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=4968294961855793821&PreviewType=books
  2. ^ https://www.aathavanitli-gani.com/Natak/Katyar_Kalajat_Ghusali
  3. ^ ऋणनिर्देश, दारव्हेकर पुरुषोत्तम, नाटक- कट्यार काळजात घुसली https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=4968294961855793821&PreviewType=books
  4. ^ ऋणनिर्देश, दारव्हेकर पुरुषोत्तम, नाटक- कट्यार काळजात घुसली https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=4968294961855793821&PreviewType=books
  5. ^ गाण्यांची सूची - https://www.aathavanitli-gani.com/Natak/Katyar_Kalajat_Ghusali
  6. ^ ऋणनिर्देश, दारव्हेकर पुरुषोत्तम, नाटक- कट्यार काळजात घुसली https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=4968294961855793821&PreviewType=books
  7. ^ ऋणनिर्देश, दारव्हेकर पुरुषोत्तम, नाटक- कट्यार काळजात घुसली https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=4968294961855793821&PreviewType=books
  8. ^ पुस्तक- नाटक- कट्यार काळजात घुसली, मलपृष्ठ- https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=4968294961855793821&PreviewType=books